मुंबई, 17 जानेवारी: आज दिनांक १७ जानेवारी २०२३मंगळवार.आज पौष कृष्ण दशमी.आज चंद्र तुला राशीतून भ्रमण करेल. चंद्रकेतू योग बनेल. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला असून दिवस कसा जाईल बघुया.
मेष
आज राशीच्या कर्म स्थानात सूर्य शुभ फळ देईल.पितृ धर्म निभवाल.नोकरीत वरिष्ठ अधिकारी व्यक्तीची भेट होईल.तसेच नवीन संधी प्राप्त होतील.वैवाहिक जीवन सुखी राहील.दिवस उत्तम.
वृषभ
आर्थिक चणचण जाणवेल. भाग्य स्थानातील रवि धर्म आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा देईल. प्रकृतीची काळजी घ्या.तसेच प्रवास आणि कौटुंबिक दृष्ट्या चांगला काळ आहे.दिवस शुभ.
मिथुन
आज पंचम चंद्र केतू नवीन विषयात रुची निर्माण करतील.शैक्षणिक क्षेत्रात यश येईल .सामाजिक आणि संतती साठी चांगला दिवस आहे.आश्रम स्थानात प्रवेश करणारा रवि शनी शुक्र योग जपून रहा असे संकेत देत आहे.
कर्क
चंद्र भ्रमण चतुर्थ स्थानातून होत आहे.घरामध्ये नवीन खरेदी होईल. जास्त काळ घरामध्ये घालवाल.मातृ चिंता निर्माण होईल.सप्तम रवि शनि जोडीदाराला घातक सिद्ध होतील.दिवस मध्यम.
सिंह
आज राशी स्वामी रवि शनी षष्ठ स्थानात आहे.मातुल घराण्याचा संपर्क होईल.तृतीय चंद्र प्रवास, धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. बंधू भेट होईल.दिवस उत्तम.
Kundali : व्यक्तीचा मृत्यू कसा आणि कुठे होईल ? कुंडलीचे आठवे घर सांगते याचे रहस्य
कन्या
धन कुटुंब स्थानातील चंद्र आर्थिक,आणि कौटुंबिक दृष्ट्या अचानक फळ देईल.पंचम रवि शनी संततीसाठी त्रास दायक आहे.पण शनि आजच कुंभेत प्रवेश करणार आहे.काळजी नको दिवस शुभ.
तुला
चतुर्थ स्थानात प्रवेश करणार रवि शनी योग घरा संबंधी चर्चा घडवेल. वास्तू लाभ,वाहन सुख मिळेल.राशीतील चंद्र केतू योग मानसिक ताण निर्माण करेल.दिवस चांगला.
वृश्चिक
व्यय चंद्र केतू आर्थिक चणचण,मानसिक ताण निर्माण करतील.तृतीय रवि शनी बंधू साठी अनुकूल नाही.प्रवास जपून करा भवताल परिस्थितीचे भान ठेवा. प्रवास करताना जपून.दिवस मध्यम.
धनू
आर्थीक दृष्टया समाधान असले तर दिवस आनंदात जातो.लाभ चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल.संतती आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल.डोळ्यांची काळजी घ्या.दिवस मध्यम.
मकर
राशीतील रवि धर्म आणि संस्कृती बद्दल आस्था देईल.तेजस्वी स्वभाव होईल.पितृ चिंता निर्माण होईल.तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात.दिवस कार्यालयीन कामकाज करण्यात घालवाल.
तृतीयपंथीयांच्या लग्नाची परंपरा, एका रात्रीची वधू बनण्यासाठी 18 दिवस विवाह
कुंभ
व्ययस्थ रवि कायदे विषयक समस्या निर्माण करेल सरकार दरबारी असलेली कामे रेंगाळतील.भाग्य स्थानातील चंद्र केतू नवीन संधी प्राप्त करून देतील . विरक्त वृत्तीचा अनुभव येईल दिवस चांगला.
मीन
अष्टम चंद्र केतू प्रकृतीची काळजी घ्या असे सांगत आहे. लाभ स्थानातील रवि शनि पित्याशी गैरसमज, नाराजी असे संकेत देत आहे. गुरू मदत करील.दिवस मध्यम.
शुभम भवतू !!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion