मराठी बातम्या /बातम्या /religion /दैनदिन राशीभविष्य: जोडीदार आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल

दैनदिन राशीभविष्य: जोडीदार आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल

चंद्र आज धनू राशीतून भ्रमण करेल. श्री गणेशाला वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया.

चंद्र आज धनू राशीतून भ्रमण करेल. श्री गणेशाला वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया.

चंद्र आज धनू राशीतून भ्रमण करेल. श्री गणेशाला वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 मार्च: आज दिनांक १६ मार्च २०२३ गुरूवार. फाल्गुन कृष्ण नवमी. चंद्र आज धनू राशीतून भ्रमण करेल. श्री गणेशाला वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया.

मेष

आज राशीच्या भाग्य स्थानात चंद्र शुभ फळ देईल. संतती आनंदी राहील.. नोकरीत वरिष्ठ अधिकारी व्यक्तीची भेट होईल. तसेच व्यय स्थानातील गुरू धार्मिक आस्था निर्माण करेल. दिवस शुभ.

वृषभ

घरात महत्वाचे निर्णय घ्याल .दशम स्थानातील बुध घर आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा देईल. प्रकृतीची काळजी घ्या. तसेच प्रवास आणि कौटुंबिक दृष्ट्या त्रासाचा काळ आहे.खर्च होतील.. दिवस शुभ.

सूर्याचे राशी परिवर्तन: 14 एप्रिलपर्यंत मीन राशीत राहणार; 4 राशींसाठी उत्तम काळ

मिथुन

आज सप्तम चंद्र जोडीदार आणि व्यवसायसंबंधी क्षेत्रात यश देईल . सामाजिक आणि संतती साठी चांगला दिवस आहे. दशम स्थानात रवि गुरू आहे. शुभ संकेत देत आहे. दिवस उत्तम.

कर्क

चंद्र भ्रमण षष्ठ स्थानातून होत आहे. . घरामध्ये नवीन खरेदी होईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस .जास्त काळ घरामध्ये घालवाल. मातृ चिंता निर्माण होईल. रवि सामाजिक, आर्थिक लाभ देईल..दिवस मध्यम.

सिंह

आज राशी स्वामी रवि अष्टम स्थानात आहे. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. चंद्र कार्य क्षेत्रात आणि सामाजिक जीवनात विशेष घटना घडवेल.,आर्थिक लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस उत्तम.

कन्या

चतुर्थ स्थानातील चंद्र व्यावसायिक आणि कौटुंबिक दृष्ट्या अचानक फळ देईल. आर्थिक लाभ होतील. शुक्र लाभ दायक आहे.. वैवाहिक जीवन आनंदी राहील. गणरायाच्या कृपेने सर्व ठीक होईल. काळजी नको . दिवस बरा.

तुला

लाभस्थानात चंद्र गुरू योग आर्थिक , प्रकृती संबंधी लाभ घडवेल. ,कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. राशीतील केतू थोडा मानसिक ताण निर्माण करेल. शनी संतती कडे लक्ष द्या असे सांगत आहे. दिवस उत्तम.

वृश्चिक

व्यय केतू आर्थिक चणचण, मानसिक ताण निर्माण करील. पंचम रवि संतती आणि शिक्षण यासाठी उत्तम आहे. प्रवास जपून करा .भवताल परिस्थितीचे भान ठेवा. घरामध्ये जास्ती काम पडेल.नोकरीमध्ये संधी, वैवाहिक दृष्ट्या दिवस मध्यम.

धनू

आर्थीक बाजू समाधानी असेल तर मन आनंदी राहील. राशीतील चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल. जोडीदार आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल. प्रवास योग येतील. डोळ्यांची काळजी घ्या. दिवस शुभ.

मकर

रवि धर्म आणि संस्कृती बद्दल आस्था देईल. तेजस्वी स्वभाव होईल.पोटाची काळजी घ्या. मातृपितृ चिंता निर्माण होईल.तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. व्यय चंद्र आर्थिक ताण देईल. दिवस सामाजिक कामकाज करण्यात घालवाल.

कुंभ

लाभ स्थानातील चंद्र संतती विषयक शुभ समाचार देईल. सरकार दरबारी असलेली कामे रेंगाळतील. राशी स्थानातील शनी मानसिक ताण देइल .विरक्त वृत्तीचा अनुभव येईल. दिवस चांगला.

मीन

व्यय शनी प्रकृती व जोडीदाराची काळजी घ्या असे सांगत आहे. रवि सरकारी कामे,वरिष्ठ भेट असे संकेत देत आहे. दशम चंद्र आणि.गुरू मदत करील. उत्पन्नात वाढ होईल. गृहसौख्य मिळेल. दिवस मध्यम.

शुभम भवतू !!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion