मराठी बातम्या /बातम्या /religion /दैनंदिन राशी भविष्य: घरात काही विशेष काम निघेल, वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल

दैनंदिन राशी भविष्य: घरात काही विशेष काम निघेल, वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल

आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल.. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल.. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल.. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 मार्च: आज दिनांक १४ मार्च २०२३ वार मंगळवार. आज फाल्गुन कृष्ण सप्तमी .आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल.. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

संतती कडून अपेक्षा उंचावणारा दिवस आहे. पराक्रम आणि आर्थिक दृष्ट्या वाढ होईल . प्रवास घडतील. मानसिक ताण जाणवेल . कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. सामाजिक जाणीव निर्माण होईल. दिवस शुभ.

वृषभ

सप्तम स्थानातील चंद्राचे भ्रमण शुभ ठरेल . खरेदी , प्रवास योग येतील . घरात काही विशेष काम निघेल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. . प्रकृती जपा. दिवस चांगला.

मिथुन

चंद्राचे षष्ठ स्थानातून भ्रमण नातेवाईकांशी संपर्क साधेल. कुटुंब सुख मिळेल .प्रवास योग ,भेटीगाठी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस गडबडीत पण मजेत जाईल.

कर्क

कर्मस्थान आणि भाग्य उदित आहे. आर्थिक पाठबळ राहील.. धार्मिक कार्यक्रमात हौसेने भाग घ्याल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. मात्र गैरसमज टाळा.संतती ठीक राहील. दिवस शुभ.

सिंह

आज मंगल दिन ईश चरणी प्रार्थना करून घालवा. धर्म आणि सामाजिक जीवनात लाभ देणारे ग्रहमान आहे. गुरू बल नसले तरी आज दिवस शांततेत पार पडेल.वैवाहिक सुख मिळेल. प्रवास योग येतील. मध्यम दिवस.

कन्या

अविवाहित व्यक्तींनी लग्नाचे जोरदार प्रयत्न करावे. जोडीदार हवा तसा मिळण्याचे योग येतील. जोडीदाराला कष्ट पडले तरी लाभ मिळेल नाव आणि प्रतिष्ठा वाढेल.आर्थिक लाभ होतील. प्रकृती जपा.दिवस मध्यम.

तुला

एक भाग्य दायक दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल .वरिष्ठ कामाची दाखल घेतील.

वैवाहिक जीवनासाठी शुभ योग असून आनंदाचे वातावरण राहील. मित्र भेट होईल. कर्ज मुक्ती होईल. दिवस शुभ .

वृश्चिक

परदेश जण्या संबंधी काही कामे पडून असतील तर आज प्रयत्न करा. होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यश देणारा दिवस आहे. वरिष्ठ खुश राहतील.घरात देखील जास्तीचे काम येईल. संततीसाठी शुभ दिवस.

धनू

गृह सौख्य ,वाहन आणि वास्तू लाभ आणि धार्मिक आस्था निर्माण करणारा दिवस आहे. व्यय स्थानातील चंद्र भ्रमण विशिष्ट अनुभव देईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मातृ पितृ सुख लाभेल.आर्थिक लाभ होतील.दिवस शुभ.

मकर

आज गुरू आणि चंद्र नवं पंचम योग करीत आहे .आनंदी राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन सुखद राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत काळजी घ्या .दिवस मध्यम.

Vastu tips: वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या, कशी असावी गर्भवती महिलेची रूम?

कुंभ

आज व्यवसायाला वेळ देऊन आपल्या दिवसाची सुरवात करा. प्रवासा साठी खर्च होतील. खर्च होईल पण नवीन खरेदी मौजमजा करण्यात दिवस जाईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे.

मीन

आज दिवस काहीसा संथ ,घरात शांतता पूर्वक जाईल. गुरू चंद्र योग उत्तम प्रकृती आणि आर्थिक लाभ दाखवीत आहे. शत्रू पासून सावध राहा. वैवाहिक सुख मिळेल. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion