
आज दिनांक १३ मार्च २०२३ वार सोमवार. आज फाल्गुन कृष्ण षष्ठी. एकनाथ षष्ठी. आज चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष आज जरा जास्तीचे काम पडेल. त्रस्त व्हाल.कठोर शब्द हानी करू शकतात. चंद्र अष्टम स्थानातून मध्यम फळ देईल . गुरू चंद्र योग अध्यात्मिक बाबीत रस निर्माण करेल. शनीचे लाभ स्थानातील वास्तव्य दिलासा देईल . दिवस मध्यम.

वृषभ आज घर आणि जोडीदार तुमची प्राथमिकता राहील. विशेष स्वच्छता ,सजावट, खरेदी यात वेळ घालवाल. खर्च कराल. एकूण दिवस हा स्वतःकरता,कुटुंबा करता वेळ देण्याचा आहे. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम दिवस.

मिथुन आज मन अस्थिर राहील. भाग्य स्थानावरील बुध आणि राशीमध्ये मंगळ प्रवेश झाला आहे . खर्च आणि उत्पन्न याचा मेळ लागणार नाही. चंद्र घरामध्ये गडबड, दाखवीत आहे . आर्थिक घडामोडी होतील. चांगला दिवस.

कर्क आज व्यय स्थानावरील चंद्र व्यावसायिक खर्च, प्रवास योग आणेल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील.. आर्थिक व्यय संभवतो. संततीसुख आणि सामाजिक लाभ मिळतील. मध्यम दिवसाचे फळ मिळेल.

सिंह आज कौटुंबिक जीवनात सुख तसेच कुटुंबात काही शुभ घटना घडतील. प्रकृती नाजूक राहील. मनात द्वंद्व होत असताना देखील इतर ग्रह मार्ग दाखवतील. गुरू कृपा होईल. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ.

कन्या संतती चिंता, घरामध्ये काहीसे ताणाचे वातावरण असा हा दिवस आहे. चंद्र संततीला आणि आरोग्याला हानिकारक ठरेल. प्रवास योग येतील. अष्टम राहू प्रकृती जपा असे सांगत आहे. सांभाळून राहा. दिवस मध्यम.

तुला अनपेक्षित घडामोडी, मित्र मैत्रिणींची भेट किंवा संपर्क आणि घरासाठी विशेष घटना असा हा दिवस आहे. कामाचा लाभ मिळेल. धन स्थानातील चंद्र जीवनात रस निर्माण करेल. आर्थिक दृष्ट्या उत्तम दिवस.

वृश्चिक आज ऑफिस मध्ये जास्तीची जबाबदारी येईल. वरिष्ठ अवलंबून राहतील.तिथे वेळ गेल्यामुळे घरामध्ये ताण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या .प्रवास योग येतील.. वैवाहिक जीवनात कलह टाळा. दिवस बरा.

धनू घरामध्ये शुभ घटना, प्रवास, धार्मिक स्थळांना भेट असा हा दिवस आहे. चंद्र गुरू संतती कडे लक्ष द्या असे सांगत आहे. बुध आर्थिक लाभ तसेच प्रकृती चांगली ठेवेल . जोडीदाराची काळजी घ्या. शुभ दिवस.

मकर आज सर्व तऱ्हेने आनंदी राहण्याचा दिवस आहे. राशीतील शनी पुढे गेला असून चंद्राचा मानसिक स्थिती वर अनुकूल परिणाम होईल. गुरू शुक्र व्यवसायात मदत करतील. पण एकूण सावध रहा. चांगला दिवस.

कुंभ बुध गोचर अनुसार जरा काळजीचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील. मात्र फारसे अवघड जाणार नाही. राशीतील शनी आणि रवि मदत करील. व्यवसाय चांगला राहील. दिवस बरा.

मीन प्रकृती आणि सामाजिक जीवनात कुरबुरी सुरू असतील तर आज कमी होतील . आर्थिक घडामोडी, निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा., घरात त्रास होण्याचा काळ आहे. काळजी घ्या. दिवस बरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.