मुंबई, 8 जानेवारी: आज दिनांक ८ जानेवारी २०२३. वार रविवार.आज पौष कृष्ण द्वितीया. चंद्र आज कर्क राशीतून भ्रमण करेल. तिथून तो शनी शुक्र आणि बुधाशी प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडेल. घरात सुखद वातावरण राहील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील.तसेच उंची वस्तूंची खरेदी होईल. दिवस शुभ.
वृषभ
आज चंद्र तृतीय स्थानातून भ्रमण करीत आहे.बंधू भगिनी भेट किंवा संपर्क होईल .प्रवासाचे योग येतील.धार्मिक बाबी, घरात शुभ सरंभ घडतील. अष्टम रवी मात्र जपून राहण्याचे संकेत देत आहे. दिवस शुभ.
मिथुन
आज चंद्र धन स्थानातून भ्रमण करीत आहे.आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. अष्टमातील ग्रह सावध राहण्याचे संकेत देत आहेत.मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो. दिवस मध्यम.
कर्क
आज राशीतील चंद्र शनीच्या प्रतियोगात असून नकारात्मक विचार देईल .कामात अडथळे येतील. वैवाहिक जीवनात उन पाऊस राहील जमवून घ्या. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. दिवस चांगला.
सिंह
आज चंद्र व्यय स्थानात असेल.काही कारण नसताना खर्च किंवा मनस्ताप संभवतो.गुरू बल नसल्याने हिम्मत कमी राहील.स्वतः मध्ये सुधारणा करा.आरोग्य जपा.नुकसान टाळायचा प्रयत्न करा. दिवस मध्यम.
कन्या
राशी च्या लाभ स्थानातून चंद्र भ्रमण सुख दायक असून प्रवास, आर्थिक लाभ दर्शवित आहे.मित्र मैत्रिणीसोबत आनंदाने दिवस व्यतीत करा.नकोसे विचार टाळा.वैवाहिक आयुष्य बरे राहील. दिवस शुभ.
तुला
आज दिवस पाहुणे मंडळींची भेट,समारंभ ,प्रवास अश्या बाबी मध्ये यश देईल.नवीन व्यक्तीची ओळख होईल.पितृ चिंता सतावेल.प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.दिवस चांगला.
वृश्चिक
भाग्य स्थानातील चंद्र धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आणि घरासंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. आर्थिक लाभ होईल.मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल.जोडीदाराची काळजी घ्या. दिवस चांगला.
धनु
आज दिवस संथ,कंटाळवाणा जाईल.मन रमणार नाही. फिरून या. आरोग्य सांभाळा.नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा आहे.
मकर
वैवाहिक जीवन आणि जोडीदार यांची काळजी घेण्याचा आज दिवस आहे.मौज मजे साठी प्रवास करताना जपून राहा. संतती चिंता वाटेल.एकूण दिवस बरा आहे.
कुंभ
षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण हे रोग ऋण शत्रू पासून सावध रहा असे आवाहन करीत आहे. प्रकृती नाजूक राहील.घरात कलह टाळा. मातृ घराण्याशी संपर्क येईल.दिवस बरा.
आज दिवस संतती आणि सामाजिक जीवनात सुखाचे क्षण घेऊन येईल .शिक्षण घेत असताना संपूर्ण एकाग्र राहावे. प्रलोभने येतील .भावंडांशी कलह किंवा त्यांना प्रकृतीचे त्रास संभवतात. दिवस चांगला जाईल.
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.