मराठी बातम्या /बातम्या /religion /कर्क राशीसाठी जवळपास प्रवासाचे योग बनतील,आज तुम्ही पत्नीची हौस पुरवाल

कर्क राशीसाठी जवळपास प्रवासाचे योग बनतील,आज तुम्ही पत्नीची हौस पुरवाल

चंद्र गुरू नव पंचम योग निर्माण होईल .पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र गुरू नव पंचम योग निर्माण होईल .पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र गुरू नव पंचम योग निर्माण होईल .पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 फेब्रुवारी: आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२३. वार शनिवार. आज माघ मास शुद्ध चतुर्दशी .चंद्र आज कर्क राशीत भ्रमण करेल. चंद्र गुरू नव पंचम योग निर्माण होईल .पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज स्वभाव शांत होईल ,वाचा शुद्ध आणि गोड असावी हेच या दिवसाचे सांगणे आहे .दशम स्थानात सूर्य आहे ,नवीन संधी चालून येतील. शुक्र अर्थार्जनाचे योग्य मार्ग सुचवेल. प्रकृती जपा. दिवस चांगला.

वृषभ

शुक्र भाग्याचे नवीन दरवाजे उघडेल. व्यय राहू मानसिक ताण देईल. कार्यरत राहून सामाजिक दायित्व निभवा. संततीची योग्य ती काळजी घ्या.खर्च आटोक्यात ठेवा.प्रवास योग येतील . दिवस शुभ.

मिथुन

आज दिवस घरगुती जबाबदारी,जास्तीचे काम,तसेच संतती चिंता असा जाईल. मात्र गुरू सर्व चिंता दूर करेल. घरात कार्य ठरतील. सध्याचा काळ हा प्रकृतीची काळजी घेण्याचा आहे.आर्थिक लाभ होतील दिवस संथ जाईल.

या मंदिरात विडी दान केल्याने होतात सर्व इच्छा होते पूर्ण

कर्क

चंद्र राशी स्थानातून अधिकारी व्यक्तीची भेट घडवून आणेल. किंवा त्यांच्याशी फोनवर संपर्क होईल. जवळपास प्रवासाचे योग बनतील. पत्नीची हौस पुरवाल. शुक्र आनंदी वातावरण ठेवेल.दिवस शुभ.

सिंह

व्यय स्थानातील चंद्र अचानक ताण निर्माण करेल . काहीसे संभ्रमित वाटेल. आर्थिक व्यय होतील . कुटुंब सोबत असेल. कर्ज देऊ नका. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

कन्या

आज दिवस लाभ चंद्र गुरू मुळे शुभ फळ देतील. स्त्री रोग असतील तर सावध राहण्याचा दिवस आहे. नकारात्मक विचार करून त्रास करून घेऊ नका. खर्च होईल. शैक्षणिक कार्य हातून घडेल. दिवस शुभ.

तुला

आज दिवस घरगुती जबाबदारी,त्यासाठी खर्च,आणि परदेश संबंधी वार्ता असा जाईल. घरामध्ये नवीन खरेदी होईल.वैवाहिक जीवन सुखाचे राहील. भावंडाना शुभ काळ आहे. खर्च जपून करा. दिवस मध्यम.

वृश्चिक

उत्तम दिवस आहे तरी प्रकृती कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शीत विकार होतील. संतती कडून चांगली बातमी मिळेल. प्रवास होतील. दिवस शांततेत घालवा..

धनू

दिवसाचे ग्रहमान स्वतः बद्दल संभ्रम निर्माण करेल. सामाजिक दृष्ट्या दिवस चांगला जाईल.कार्यालयीन कामकाज नेहमीपेक्षा जास्त करावे लागेल.संतती चिंता लागून राहिलं.घरात काही काम निघेल.दिवस मध्यम.

हे मंदिर आहे हनुमंताचे न्यायालय, बजरंगबलीला मानतात न्यायाधीश !

मकर

राशीतील शनी आता कुंभ राशीत गेला आहे. सप्तम चंद्र गुरू प्रवास, धार्मिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. धनस्थानी शुक्र व्यक्तीमत्वात सुधार आणेल. आर्थिक लाभ देईल.दिवस शुभ.

कुंभ

सध्याचे ग्रहमान फारसे अनुकूल नाही .व्ययस्थ ग्रह नुकसान आणि निराशाजनक घटना घडवतील. आज चंद्र देखील अनुकूल नाही.प्रवास टाळा.जपून रहावे हे बरे. दिवस मध्यम.

मीन

राशीतील गुरू आणि पंचम चंद्र योगाचे सुंदर परिणाम दिसतील.एक ऊर्जावान दिवस आहे. वैवाहिक जीवन सुखद राहील .लाभ घडतील. मित्र भेट संभवते. अनुकूल दिवस.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion