मराठी बातम्या /बातम्या /religion /या महिला असतात खूपच मेहनती...त्याचसोबत असतात खूप संयमी

या महिला असतात खूपच मेहनती...त्याचसोबत असतात खूप संयमी

मुलांक 8 चे जातक भूतकाळात रममाण होणारे असतात.

मुलांक 8 चे जातक भूतकाळात रममाण होणारे असतात.

मुलांक 8 चे जातक भूतकाळात रममाण होणारे असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई , 1 फेब्रुवारी:  महिला म्हटल की खूप खर्च करणाऱ्या असा समज सामान्यता असतो. मात्र अस सर्वच महिलांबाबत खर ठरत नाही तर काही महिला त्याला अपवाद असतात. 8 या मूल्यांकच्या महिला खूप कमी खर्च करणाऱ्या ,धनाचा जास्त संचय करणाऱ्या त्याच सोबत खूप मेहनती आणि संयमी देखील असतात.

जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 8 येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 8,17,26  या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते.

स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी

समजा जातकाचा जन्मदिनांक  हा 17 मे 1991आहे तर 17 या  दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा  मूल्यांक होय.

8   हा मूल्यांक

17  = 1 +7 =8  = मूल्यांक.

8 या अंकाचा ग्रह शनी आहे .

जाऊन घेऊयात 8 मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये:

8 मूल्यांकच्या लोकांवर शनी ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. सूर्य पुत्र आहेत शनी. तरीदेखील ते एकमेकांचे शत्रू आहेत. 8  मूल्यांकचे लोक धीर गंभीर संयमी स्वभावाचे असतात. खूप मेहनती असतात हे लोक. सतत कामात राहतात हे लोक. कामात खूप चिवट असतात. गंभीर स्वभावाचे असतात हे लोक. यांना हळूहळू सफलता मिळते. यांना वाचनाचीही आवड असते. लिखाण करणे, संपादन करणे, प्रकाशन, साहित्य या क्षेत्रात हे जातक कार्य करतात. साधे सरळ स्वभावाचे असल्यामुळे त्यांची प्रगती हळू हळू कमी प्रमाणात होते, यांच्यात फसवे गिरीची वृत्ती नसते. भूतकाळात रममाण होणारे असतात. खूप मोठी स्वप्न असणारे असतात.  यांच्यात चुंबकीय शक्ति असते. खूप कुशाग्र बुद्धीचे असतात. कोणावर अवलंबून नसणारे असतात. कोणतही काम प्रामाणिकपणे करतात. हे लोक डॉक्टर, आयटी, सर्जन, ज्योतिषी या क्षेत्रात अग्रेसर असतात.

8   मूल्यांकाचा

 शुभ    अंक - 1 ,4,8,5 

अशुभ  अंक - 2,9 

शुभ वार - शनिवार,रविवार ,सोमवार

अशुभ वार -कोणताच नाही 

शुभ रंग - सफेद ,लाल,हिरवा

अशुभ रंग -कोणताच नाही 

विकार – कावीळ ,दंत रोग ,

संधीवात

लाभकारी रत्न- निलम

उपासना – हनुमान चाळीसा, शनी मंत्र,  बुधवारी गाईला चारा देणे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology, Rashibhavishya, Rashichakra, Religion