मराठी बातम्या /बातम्या /religion /सासरी निघालेल्या मुलीला या वस्तू कधीच देऊ नये; घडू शकतात त्यामुळे अमंगळ गोष्टी

सासरी निघालेल्या मुलीला या वस्तू कधीच देऊ नये; घडू शकतात त्यामुळे अमंगळ गोष्टी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात. लग्नात मुलीला संसारसट/रुकवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 मार्च : लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई-वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवरा नवरा आणि सासर मिळावं, अशी आई-वडिलांची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात. लग्नात मुलीला संसारसट/रुकवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते. मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत. सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी या गोष्टींचा उल्लेख आपल्या प्रवचनात केला आहे. जाणून घेऊया कन्या सासरी चालली असताना तिला कोणत्या गोष्टी देणं टाळायला हवं.

लोणचे -

पंडित प्रदीप मिश्रा म्हणतात की, सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये. याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात. लोणच्याची चव आंबट असल्यानं ते भेट म्हणून देणं योग्य नाही. मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचे बनवा.

झाडू -

पंडितजी सांगतात की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते, पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये. असे मानले जाते की, जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही. तिचे जीवन दु:खाने भरलेले असते, असे मानले जाते.

सुई किंवा टोकदार वस्तू -

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते, असे म्हणतात. त्यामुळे अशा गोष्टी देणे टाळावे.

चाळणी -

मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणीदेखील देऊ नये, असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात 13 गोष्टींचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकीच एक. मात्र, चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात, असे मानले जाते.

हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Culture and tradition, Marriage, Religion