मराठी बातम्या /बातम्या /religion /नशीब दगा देण्यामागं घरातील या गोष्टी असतील कारण! अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात

नशीब दगा देण्यामागं घरातील या गोष्टी असतील कारण! अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात

नशीब आणि वास्तुशास्त्र

नशीब आणि वास्तुशास्त्र

प्रत्येक घरात विद्युत उपकरणे, पाण्याचे नळ खराब होणे हे तसे सामान्य वाटते, परंतु नळ, ट्यूबलाइट बल्ब पुन्हा पुन्हा खराब होत असतील तर ते अजिबात सामान्य मानले जाऊ नये. कारण...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 फेब्रुवारी : आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवणं योग्य मानलं जात नाही. वास्तुशास्त्रात असं सांगण्यात आलं आहे की, अशा गोष्टी घरात ठेवल्यानं घरात नकारात्मकता वाढते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. प्रत्येक घरात विद्युत उपकरणे, पाण्याचे नळ खराब होणे हे तसे सामान्य वाटते, परंतु नळ, ट्यूबलाइट बल्ब पुन्हा पुन्हा खराब होत असतील तर ते अजिबात सामान्य मानले जाऊ नये. घरातील अशा वस्तूंचे वारंवार नुकसान होणे ग्रह दोष दर्शवते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

- सदोष विद्युत उपकरणे

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेले इलेक्ट्रिक सामान अचानक खराब झाले किंवा पुन्हा पुन्हा खराब होत असेल, घरातील ट्यूब लाइट पुन्हा पुन्हा फ्यूज होत असतील तर ते घरातील राहू दोषाशी संबंधित समस्या दर्शवते. राहू दोषामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते, असे मानले जाते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर त्यासाठी घराच्या मुख्य ठिकाणांवर लाल स्वस्तिक काढा आणि घरामध्ये कोणतीही अडगळ साचू देऊ नका.

- नळांचे वारंवार बिघडणे

जल घटक मुख्यतः चंद्र आणि शुक्राशी संबंधित मानले जातात. काही प्रकरणांमध्ये, ते मंगळाशी देखील संबंधित आहेत. स्वयंपाकघरातील बाथरूममध्ये किंवा घराच्या इतर कोणत्याही ठिकाणी लावलेल्या नळातून पाणी सतत टपकत असेल तर ते घरासाठी अशुभ मानले जाते. घराच्या बाथरूममध्ये नळातून टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबात नकारात्मक ऊर्जा राहते. अशा परिस्थितीत पाण्याचा अपव्यय किंवा वाहून जाणे हे घरासाठी चांगले मानले जाऊ शकत नाही. त्यामुळे घरात उधळपट्टी वाढण्याची शक्यता निर्माण होते.

- घरात वारंवार कलह

एखाद्या व्यक्तीच्या घरात विनाकारण सतत भांडण होत असेल आणि वाद इतका वाढतो की, नात्यात दुरावा निर्माण होतो, घरातील सदस्यांमध्ये वैर वाढत जाते, तर अशा व्यक्तींसाठी कुटुंबात मंगळाची स्थिती चांगली नाही असे मानले जाते. यासाठी तुमच्या घरात सूर्यप्रकाशाची पुरेशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

हे वाचा - सोमवारी उपवास करण्याऱ्यांनी या चुका टाळा; महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu