मराठी बातम्या /बातम्या /religion /

घरात पाल चुकचुकणे, अंगावर पडण्याचा काय असतो अर्थ? मिळतात शुभ-अशुभ संकेत

घरात पाल चुकचुकणे, अंगावर पडण्याचा काय असतो अर्थ? मिळतात शुभ-अशुभ संकेत

प्रत्येकाच्या घरात आढळणारी पाल देखील भविष्यातील अनेक घटनांबद्दल संकेत देते, असे मानले जाते. तुम्हाला फक्त ते संकेत ओळखण्याची गरज आहे.

प्रत्येकाच्या घरात आढळणारी पाल देखील भविष्यातील अनेक घटनांबद्दल संकेत देते, असे मानले जाते. तुम्हाला फक्त ते संकेत ओळखण्याची गरज आहे.

प्रत्येकाच्या घरात आढळणारी पाल देखील भविष्यातील अनेक घटनांबद्दल संकेत देते, असे मानले जाते. तुम्हाला फक्त ते संकेत ओळखण्याची गरज आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 18 सप्टेंबर : भविष्यातील संभाव्य घटनांची जाणीव करून देण्यासाठी निसर्गाने अनेक माध्यमे निर्माण केली आहेत, असे मानले जाते. पशु-पक्षी आणि प्राणी हे देखील त्या माध्यमांपैकी एक आहेत. पशु-पक्षी, प्राणीही अनेक गोष्टींमधून आपल्याला भविष्यातील घडामोडींचे संकेत देतात. सध्या अशा गोष्टींवर पूर्णपणे विश्वास ठेवला जात नाही, परंतु शगुन शास्त्रामध्ये पशु-पक्षी इत्यादींकडून प्राप्त होणाऱ्या संकेतांचे वर्णन स्पष्टपणे आढळते. प्रत्येकाच्या घरात आढळणारी पाल देखील भविष्यातील अनेक घटनांबद्दल संकेत देते, असे मानले जाते. तुम्हाला फक्त ते संकेत समजून घेण्याची गरज आहे. या संदर्भात अधिक माहिती ज्योतिषी आचार्य विनोद सोनी पोद्दार यांनी दिली आहे. पाल भविष्यातील संकेत देते - 1. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान-सन्मान मिळण्याची शक्यता असते. 2. जर ती डाव्या हातावर पडली तर धनहानी होऊ शकते. तर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूवर पडून डाव्या बाजूने खाली उतरली तर पदोन्नती, धनलाभ होण्याची शक्यता असते. 3. नवीन घरात प्रवेश करताना घरमालकाला पाल मेलेली आणि माती लागलेली दिसली तर त्यात राहणारे लोक आजारी पडू शकतात. हा अपशकुन टाळण्यासाठी नियमानुसार पूजा करूनच नवीन घरात प्रवेश करावा. 4. जर पाल आवाज करताना दिसली तर आपली एखाद्या जुन्या मित्राशी भेटू होऊ शकते. सहवासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागेल. पाल भांडताना दिसली तर ओळखीच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता असते. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं 5. शकुन शास्त्रानुसार दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच काही शुभवार्ता मिळू शकतात किंवा काही शुभ परिणाम मिळू शकतात. मात्र, असं फार दुर्मिळ आहे, कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या