मुंबई, 29 नोव्हेंबर : तिसरे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले श्री महाकालेश्वर, उज्जैन मंदिरा विषयीची महती जगप्रसिद्ध आहे. पृथ्वीच्या नाभी स्थळावर मध्यप्रदेशतील उज्जैन शहरातील क्षिप्रा नदीच्या तळ्याकाठी वसलेले स्वयंभू असे हे ज्योतिर्लिंग आहे. भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाकालेश्वराचं दर्शन घेतलं होतं.
शिव पुराणात ज्योतिर्लिंगचे संदर्भ आढळतात. हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. शालिग्रामच्या शिवलिंगावर चांदीचे कवच चढवले आहे. हे एकमेव असे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. मंदिरात एक छोटासा जलश्रोत आहे त्याला कोटी तीर्थ म्हणतात. या मंदिरात महाशिरात्रीत विजया दशमिस मोठा उत्साह होतो. येथे पंचामृत पूजा, धान्य पूजा ,पुष्प पूजा पाहण्यासाठी भाविकांची तारांबळ असते. येथील भस्म आरती देखील प्रसिद्ध आहे.
अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का।
प्रेमात कधीच धोका देत नाही या मुली, भरभरून प्रेम करतात...
एकदा त्रिपुरा सुर नावाचा राक्षक खूप माजला होता ऋषीमुनिना तो त्रास देत होता. त्याचा वध शिव शंकरानी केला. म्हणून या ठिकाणचे नाव उज्जैन असे पडले. या मंदिराला 5 मजले आहेत. या जागेवर सतीचे कोपर जळून पडले होते म्हणून इथे देवीच्या पूजे ऐवजी कोपराची पूजा केली जाते. माता पार्वतीचे ही इथे एक मंदिर आहे. महादेवाचे एक नाव हर असे आहे. महादेवाच्या सांगण्यावरून माता पार्वतीने तिथे एका राक्षसाचा वध केला होता. म्हणून तिथे पार्वती मातेला हरसिद्धी ही म्हणतात. सध्या हे श्री महाकालेश्वर मंदिर, उज्जैन पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. कारण आहे राहुल गांधी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज महाकालेश्वरचे दर्शन घेतले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Famous temples, Lifestyle, Religion