मुंबई, 18 मार्च: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा एक अतिशय विशेष आणि प्रभावशाली ग्रह मानला जातो. शनी हा न्याय आणि कर्माचा ग्रह मानला गेला आहे. शनिदेव व्यक्तींना त्यांच्या कर्माच्या आधारे शुभ किंवा अशुभ फल देतात. जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेव अशुभ असतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात. पण दुसरीकडे शनिदेव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुभ स्थानावर असेल तर तो त्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुख-सुविधा, ऐशोआराम आणि संपत्ती मिळते.
ज्योतिष शास्त्रात शनिदेवाची दृष्टी खूप अशुभ मानली जाते, अशा स्थितीत काही गोष्टी करणे टाळावे, अन्यथा शनिदेव कोपतात. वास्तूमध्ये शनि हा पश्चिम दिशेचा स्वामी आहे. वास्तूमधील शनिदेवाशी संबंधित काही नियम जाणून घेऊया.
शनिदेव आणि वास्तूचे नियम
वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला उघडल्यास घरात नकारात्मकता वाढते. जागेच्या समस्येमुळे घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला लावावा लागत असेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दाटीवाटीने झाडे लावावीत.
घराच्या पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा रद्दी आणि घाण ठेवू नका. यामुळे शनिदेव क्रोधित होतात आणि आपल्या अशुभ दृष्टीने घरात दारिद्र्य आणतात.
घराच्या पश्चिमेला खिडकी असेल तर ती खिडकी पूर्वेकडील भिंतीच्या खिडकीपेक्षा लहान असावी. अन्यथा नकारात्मक ऊर्जा वाढते.
घराची पश्चिम बाजू उघडी असावी. ज्या घरांमध्ये पश्चिम दिशा बंद असते, त्या घरांमध्ये राहणाऱ्या सदस्यांना मानसिक तणाव वाढतो.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला कधीही स्वयंपाकघर असू नये. अशा घरात आर्थिक चणचण आणि कलह कायम राहतो.
- पती-पत्नीची खोली पश्चिम दिशेला असल्याने दोघांमध्ये तणाव वाढतो.
- तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला वास्तुदोष असेल तर घरात शनियंत्र अवश्य ठेवा. यामुळे या वास्तुदोष निघून जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion, Vastu