मराठी बातम्या /बातम्या /religion /सुगंधाने दूर होतील नवग्रहांचे दोष, या उपायाने ग्रहांची शांती होऊन मिळेल समृद्धी

सुगंधाने दूर होतील नवग्रहांचे दोष, या उपायाने ग्रहांची शांती होऊन मिळेल समृद्धी

ग्रहांच्या आवडीनुसार परफ्यूम किंवा सुगंध वापरणे त्यांना अनुकूल ठेवण्यास मदत करते.

ग्रहांच्या आवडीनुसार परफ्यूम किंवा सुगंध वापरणे त्यांना अनुकूल ठेवण्यास मदत करते.

ग्रहांच्या आवडीनुसार परफ्यूम किंवा सुगंध वापरणे त्यांना अनुकूल ठेवण्यास मदत करते.

मुंबई, 27 मे: हिंदू धर्मात नऊ ग्रहांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ आणि अशुभ फळ मिळतात. ग्रहांच्या शांतीसाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. काही जण रत्ने घालतात तर कोणी हार घालतात. जर तुमच्या जीवनात ग्रहांमुळे अनेक समस्या येत असतील तर त्या शांत करण्यासाठी तुम्ही सुगंधाचा वापर करू शकता. चला जाणून घेऊया की, ग्रहांच्या आवडीनुसार परफ्यूम किंवा सुगंध वापरणे त्यांना अनुकूल ठेवण्यास मदत करते.

सूर्य

कुंडलीत सूर्याचा अशुभ प्रभाव दिसत असेल तर केशर किंवा गुलाबाचा सुगंध वापरावा. लक्षात ठेवा की केवळ नैसर्गिक आणि फुलांचा सुगंध वापरा.

चंद्र

चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. कुंडलीत चंद्र ग्रह कमकुवत असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याशी संबंधित आजार होतात. अशा स्थितीत चंद्राची शुभ प्राप्ती करण्यासाठी चमेली आणि रातराणीचे अत्तर लावू शकता.

या वृक्षांची मुळे ठरतील भाग्यशाली, धारण करणाऱ्यांचे बदलते नशीब

मंगळ

मंगळ हा अग्नि, धैर्य आणि ऊर्जेचा सूचक मानला जातो. ग्रहांचा सेनापती मंगल ग्रह अनुकूल ठेवायचा असेल तर लाल चंदनाचा सुगंध वापरावा. ते तुम्ही तेल, परफ्यूमसारखे वापरू शकता.

बुध

वेलची आणि चंपा यांचा सुगंध बुधा ग्रहाला प्रिय आहे. त्यांचे परफ्यूम किंवा तेल वापरणे हे बुध ग्रहाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम मानले जाते. अंगावर परफ्यूम लावायचे असेल, तर ते फक्त नाभी, मनगट आणि मानेच्या मागे लावावे.

गुरू

देवांचे गुरू मानल्या जाणाऱ्या गुरू ग्रहाची शांती केवडा किंवा केशराचा सुगंध वापरून करता येते. पिवळ्या फुलांच्या सुगंधाने गुरू ग्रहाचे शुभ फळ मिळू शकते.

नशीब उजळण्यासाठी या उपायांचा करा अवलंब

शुक्र

शुक्र ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागतात. शुक्र ग्रहाला शांत करण्यासाठी पांढरी सुगंधी फुले, पांढरे चंदन आणि कापूर सुगंधाचा वापर फायदेशीर ठरतो.

शनि

शनिदोष कमी करण्यासाठी कस्तुरी आणि लोबानचा सुगंध वापरणे चांगले. शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी एका बडीशेपचा सुगंध घरीही वापरता येतो.

राहू आणि केतू

राहू-केतू ग्रहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गाईचे तूप आणि कस्तुरीचे अत्तर वापरा. राहू-केतूचे शुभफळ मिळवण्यासाठी गूळ आणि तुपाची धुणीही घरात देऊ शकता.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Life18, Rashibhavishya, Rashichakra, Religion, Religion18