घरात भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना करताय? या गोष्टींची घ्या काळजी

घरात भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना करताय? या गोष्टींची घ्या काळजी

वास्तुशास्त्रानुसार घरात देवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा (Positive energy) मिळते. घरात देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो (God Photos) ठेवल्याने सुख-समृद्धी येते. हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये भगवान शंकराला (Lord Shiva) सर्वोच्च मानलं गेलंय.

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : वास्तुशास्त्रातील (Vastushastra) उपाय जीवनात सुख (Happiness), समृद्धी आणि प्रगतीसाठी (Progress) खूप उपयुक्त मानले जातात. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरात देवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा (Positive energy) मिळते. घरात देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो (God Photos) ठेवल्याने सुख-समृद्धी येते. हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये भगवान शंकराला (Lord Shiva) सर्वोच्च मानलं गेलंय.

शंकराच्या कृपेने आपल्यावर आलेलं मोठ्यातलं मोठं संकटही टळू शकतं. त्यामुळे घरामध्ये शंकराच्या मूर्तीची किंवा फोटोची प्रतिष्ठापना करावी. असं हिंदू धर्मशास्र सांगतं; पण त्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपण पंडित इंद्रमणी घनस्याल यांच्याकडून जाणून घेऊया घरी शंकराची मूर्ती प्रतिष्ठित करताना किंवा फोटो लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

भगवान शंकराचा फोटो कोणत्या दिशेला लावावा?

घरामध्ये भगवान शंकराचा फोटो जरूर लावा, परंतु घरामध्ये भगवान शंकराचा फोटो कोणत्या दिशेला लावायला हवा, हे माहीत असणंदेखील महत्त्वाचं आहे. भगवान शंकराची आवडती दिशा उत्तर (North) आहे आणि याच दिशेला त्यांचे निवासस्थान कैलास पर्वत (Kailas Parvat) आहे. त्यामुळे घरामध्ये शंकराचा फोटो लावण्यासाठी उत्तर दिशेची निवड करावी. या दिशेला त्यांचा फोटो लावल्याने शुभ फळ मिळते. उत्तर दिशेला भगवान शंकराचा असा फोटो लावा, ज्यामध्ये ते शांत आणि ध्यानस्थ आहेत किंवा नंदीवर बसलेले आहेत. तसंच उत्तर दिशेला भगवान शंकराचा फोटो अशा ठिकाणी लावा, जिथून घरातील प्रत्येकजण त्यांचं दर्शन घेऊ शकेल.

भगवान शंकराच्या कुटुंबाचा फोटो

याशिवाय तुम्ही घरात भगवान शंकराचा त्यांच्या कुटुंबासोबत बसले असतानाचा फोटोदेखील लावू शकता. त्यांचा फोटो घरात लावताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ती म्हणजे भगवान शंकर संतप्त (Anger) किंवा त्यांनी रौद्ररुप धारण केलेला फोटो अजिबात लावू नका. असा फोटो निवडल्यास घरात सकारत्मकता नाही तर नकारात्मकता येईल, तसंच घरातील सुख-शांतीसाठी त्यांचा संतप्त मुद्रेतील फोटो लावणं चांगलं नाही.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

सध्या पवित्र श्रावण महिना (Shravan) सुरू आहे, आज शिवजींचा वार सोमवार (Monday) आहे. आजचा शुभ दिवस पाहून तुम्ही भगवान शंकराचा फोटो (Lord Shiva Photo) घरात लावण्याचा विचार करत असाल तर त्यांची आवडती दिशा आणि त्यांचा प्रसन्न मुद्रेतील फोटो निवडा. यामुळे तुमच्या घरात सुख,शांती आणि समृद्धी नांदेल.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published: August 2, 2022, 6:15 AM IST

ताज्या बातम्या