मराठी बातम्या /बातम्या /religion /

स्वप्नात दिसणाऱ्या या घटना शुभ संकेत देतात; मोठी कामं तडीस लागण्याची चिन्हे

स्वप्नात दिसणाऱ्या या घटना शुभ संकेत देतात; मोठी कामं तडीस लागण्याची चिन्हे

स्वप्नांचा अर्थ काय

स्वप्नांचा अर्थ काय

स्वप्न पाहणं ही सर्वसामान्य बाब आहे, परंतु स्वप्ने आपल्याला काही ना काही संकेत देऊन जातात, ज्याचा उल्लेख स्वप्न शास्त्रात केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 27 नोव्हेंबर : स्वप्नांच्या अनाकलनीय दुनियेत कधी आणि काय घटना घडतात हे कोणालाच समजत नाही. स्वप्नांवर आपले नियंत्रण नसते, प्रत्येक व्यक्ती झोपल्यानंतर स्वप्ने पाहतो. चांगली आणि वाईट अशी स्वप्ने अनेक प्रकारची असतात जसे काही स्वप्ने खूप भयावह असतात तर काही चांगली स्वप्ने देखील येतात. स्वप्न पाहणं ही सर्वसामान्य बाब आहे, परंतु स्वप्ने आपल्याला काही ना काही संकेत देऊन जातात, ज्याचा उल्लेख स्वप्न शास्त्रात केला आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, स्वप्नात घडणाऱ्या घटना शुभ आणि अशुभ संकेच दर्शवतात. जाणून घेऊया त्या स्वप्नांबद्दल जे शुभ संकेत देतात.

अशी स्वप्ने शुभ संकेत देतात

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मंदिर दिसल्यास किंवा मंदिराच्या पुजाऱ्याकडून नारळ, मिठाई इत्यादी प्रसाद म्हणून घेताना दिसल्यास ते शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्वप्नात महादेवाचे मंदिर दिसले तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल. जर तुम्हाला स्वप्नात आंब्याचे झाड दिसले तर ते तुमच्या जीवनात प्रगती होण्याचे संकेत आहे.

स्वप्नात पर्वत चढणे -

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पर्वतावर चढताना पाहणे देखील शुभ असते. महादेवाच्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होणार असल्याचे हे लक्षण आहे. स्वप्नात गाईचे दूध दिसले तर ते सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे तुमची आर्थिक समृद्धी वाढताना दिसून येते.

स्वप्नात गुलाब, पोपट पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात गुलाबाचे फूल दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येत आहे आणि काही मोठे काम होणार आहे. त्याचप्रमाणे स्वप्नात पोपट पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. पोपट दिसणे म्हणजे तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. तुमचे बिघडलेले काम पूर्ण होऊन जीवनात प्रगती होण्याचा तो संकेत असू शकतो.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion