मराठी बातम्या /बातम्या /religion /

Swapna Shastra: तुम्हाला कधी तुमच्या लग्नासंबंधी स्वप्न पडलंय का? अशा स्वप्नांचा 'हा' असतो अर्थ

Swapna Shastra: तुम्हाला कधी तुमच्या लग्नासंबंधी स्वप्न पडलंय का? अशा स्वप्नांचा 'हा' असतो अर्थ

स्वप्न शास्त्र

स्वप्न शास्त्र

काही वेळा लोकांना विवाहाशी संबंधी स्वप्न पडतात. एखाद्या व्यक्तीचा किंवा स्वतःचा विवाह होणं, वरात दिसणं, लग्नासाठी पेहेराव परिधान केलेला वर दिसणं अशा स्वरूपाची स्वप्न पडतात. यामागे विशेष अर्थ दडला असल्याचं स्वप्न शास्त्र सांगतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

marriageमुंबई, 28 सप्टेंबर :  रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. काही वेळा एखाद्या स्वप्नामुळे आपल्याला आनंद वाटतो तर कधी आपण स्वप्नामुळे खूप घाबरून झोपेतून जागे होतो. ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र, वास्तू शास्त्रात मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांची कारणं, अर्थ आदी गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नशास्त्रात स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी, त्याचा अर्थ आणि वास्तविक जीवनाशी त्याचा संबंध या विषयी सांगितलं गेलं आहे. त्यामुळे एखादं भयावह स्वप्न पाहिलं तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण काही भयावह गोष्टी स्वप्नात दिसल्या तरी वास्तविक जीवनात त्याचे संकेत शुभ असू शकतात. काही वेळा लोकांना विवाहाशी संबंधी स्वप्न पडतात. एखाद्या व्यक्तीचा किंवा स्वतःचा विवाह होणं, वरात दिसणं, लग्नासाठी पेहेराव परिधान केलेला वर दिसणं अशा स्वरूपाची स्वप्न पडतात. यामागे विशेष अर्थ दडला असल्याचं स्वप्न शास्त्र सांगतं.

रात्री झोपेत स्वप्न पडणं हे सामान्य आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचा अर्थ शोधू लागतो. काही लोकांना विवाहाशी निगडीत स्वप्न पडतात. या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्रात सांगितला गेला आहे. जर तुम्हाला स्वप्नात वधुवराची जोडी दिसली तर ते अशुभ घटनेचे संकेत असतात. तुमच्या जीवनात लवकर एखादी आर्थिक समस्या निर्माण होणार आहे, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे असं स्वप्न पडलं तर तात्काळ अनावश्यक खर्चावर लगाम घाला.

हेही वाचा - Daily Horoscope : 'ही' रास आणि 'हे' क्षेत्र असेल तर आज Good News पक्की; पटापट पाहा तुमचं राशिभविष्य

जर स्वप्नात तुम्ही स्वतःचा विवाह होताना पाहिला तर असं स्वप्न शुभ मानलं जातं. तुमचं वैवाहिक जीवन सुखी असेल आणि जोडीदारासोबत तुमचं चांगलं बॉंडिंग असेल, असा त्याचा अर्थ असतो. पती आणि पत्नीमधला जिव्हाळा, प्रेम वाढण्याचे हे संकेत असतात.

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही एखादं जोडपं विवाहबंधनात अडकताना पाहिलं तर ते अशुभ असतं. लवकरच तुम्हाला जीवनात संकटाचा सामना करावा लागेल. तसंच एखाद्या कामात अपयश आल्यानं जीवनात समस्या निर्माण होतील असा त्याचा अर्थ असतो.

जर तुम्ही स्वप्नात विवाहासाठी वस्त्र परिधान केलेली वधू पाहिली तर तुमच्या जीवनात आनंद निर्माण होण्याचे हे संकेत असतात. तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी समजेल तसंच घरात धनलक्ष्मीचं आगमन होणार आहे, असा याचा अर्थ असतो.

तुम्ही जर स्वप्नात लग्नाची वरात चाललेली पाहिली तर ते अशुभ घटनेचे संकेत असतात. स्वप्नशास्त्रानुसार, तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला भविष्यात गंभीर आजार होण्याचे हे संकेत असतात. त्यामुळे असं स्वप्न पडताच तातडीनं सतर्क होत स्वतःची तसंच कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं असतं.

First published:

Tags: Astrology and horoscope