Surya Grahan 2022 : यंदा दिवाळीवर सूर्यग्रहणाचं सावट! तुम्हाला माहिती असाव्यात या गोष्टी

Surya Grahan 2022 : यंदा दिवाळीवर सूर्यग्रहणाचं सावट! तुम्हाला माहिती असाव्यात या गोष्टी

दिवाळी हा आनंदाचा सण असतो मात्र यंदाच्या दिवाळीवर सूर्यग्रहणाचे सावट आहे. या वर्षातले दुसरे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजेच कार्तिक शुक्ल प्रतिपदेला 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 4 ऑगस्ट : दिवाळी हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण असतो. दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा 24 ऑक्टोबर रोजी (Diwali 2022 Date) दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असतो मात्र यंदाच्या दिवाळीवर सूर्यग्रहणाचे सावट आहे. या वर्षातले दुसरे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजेच कार्तिक शुक्ल प्रतिपदेला 25 ऑक्टोबर रोजी (Surya Grahan 2022 Date) होणार आहे. या दिवशी पाडवा, गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव हे सण साजरे केले जातात. ज्योतिषांनुसार दिवाळीला सूर्यग्रहणसोबतच महानिषीत काल योगही तयार होणार आहे. पाडवण्याच्या दिवशी सूर्यग्रहण होणार असले तरी दिवाळीच्या रात्रीपासूनच सुतक कालावधी सुरू होईल. जाणून घेऊया या सूर्यग्रहणाशी संबंधित महत्वाच्या बाबी.

सूर्यग्रहणाची वेळ

यंदाचे दुसरे सुर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी आहे. सूर्य ग्रहणाचा कालावधी संध्याकाळी 04:29 ते 05:24 पर्यंत सूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण युरोप, आफ्रिका खंडाचा ईशान्य भाग, आशियाचा नैऋत्य भाग आणि अटलांटिकमध्ये दिसणार आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे या काळात सुतक कालावधी वैध माणला जाणार नाही.

भारतातच नाही विदेशातही आहेत महादेवाचे भक्त, पाहा भारताबाहेरील शिवमंदिराचे फोटो

दिवाळी 2022 शुभ मुहूर्त

यंदा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी म्हणजेच दिवाळी 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी अमावस्या सायंकाळी 05.28 पासून 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 04.18 पर्यंत असेल. या दिवशी प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत पूजेचा सुभ मुहूर्त संध्याकाळी 05:50 ते रात्री 08:22 पर्यंत असेल.

Vastu Tips: अशा गोष्टी स्टोअर रूम, किचनमध्ये कधीच ठेवू नयेत, नाहक अडचणी वाढत जातात

महानिषथ काल योग

महानिषथ काळात काली देवीची पूजा केली जाते. यंदा दिवाळीच्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी महानिषथ काळ रात्री 10:55 पासून 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:53 पर्यंत असेल.

Published by: Pooja Jagtap
First published: August 4, 2022, 6:00 AM IST

ताज्या बातम्या