मराठी बातम्या /बातम्या /religion /

कुंडलीत चंद्रदोष असेल तर काय करायचं? 'हे' उपाय ठरतील उपयोगी

कुंडलीत चंद्रदोष असेल तर काय करायचं? 'हे' उपाय ठरतील उपयोगी

चंद्रदोष

चंद्रदोष

चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र प्रबळ किंवा सुस्थितीत असेल अशा व्यक्तीची मानसिक ताकद उत्तम असते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,06 डिसेंबर:   ज्योतिषशास्त्रात रवी, चंद्रासह नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. भविष्य कथनावेळी ग्रहांचे राशी परिवर्तन, गोचर भ्रमण आणि महादशा आदी घटक प्रामुख्याने विचारात घेतले जातात. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. नवग्रहांमध्ये रवी आणि चंद्राच्या भ्रमणाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. रवी हा ग्रह मानवी शरीरावर तर चंद्र मानवी मनावर परिणाम करतो, असं ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांचे मत आहे. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र प्रबळ किंवा सुस्थितीत असेल अशा व्यक्तीची मानसिक ताकद उत्तम असते. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थिती, समस्येवर सहजपणे मात करू शकते. कोणताही प्रश्न अत्यंत विचारपूर्वक सोडवण्याची क्षमता त्याच्यात असते. पण चंद्र जर कमकुवत असेल तर संबंधित व्यक्ती कायम मानसिकदृष्ट्या अशांत आणि चिंताग्रस्त राहते. कुंडलीत चंद्राशी निगडीत दोष कोणते असतात आणि ते दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात कोणते उपाय सांगितले गेले आहेत, ते जाणून घेऊया.

चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. कर्क ही चंद्राची स्वराशी आहे. कुंडलीत चंद्राला स्थानबल, राशीबल नसेल किंवा तो शनि, राहू किंवा केतूच्या युती अथवा योगात असेल तर मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्राचे जाणकार सांगतात. ग्रहांची शुभ फळं मिळावीत यासाठी ज्योतिषशास्त्रात पूजाविधी, रत्नासंह विविध उपाय सांगितले गेले आहेत. जर तुम्हाला पूजाविधी किंवा रत्न परिधान करणं शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी चंद्राशी संबंधित तांदूळ, साखर, दूध, चांदी, मोती, पांढरे वस्त्रं, पांढरी फुलं, पांढरं चंदन आदी वस्तू दान करू शकता.

हेही वाचा- दत्तजयंतीची पूजा केल्यानं पितृदोषातून मिळते मुक्ती, जाणून घ्या पूजा पद्धत आणि मंत्र

ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचे दोष दूर करण्यासाठी रत्नाचा वापर करणं, हा उत्तम उपाय मानला जातो. चंद्राशी संबंधित दोष दूर करण्यासाठी सोमवारी चांदीच्या अंगठीत मोती घालून ती वापरावी. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्रदोष आहेत, त्यांनी चंद्र दर्शन करणं गरजेचं आहे. चंद्राचं अशुभत्व दूर करण्यासाठी सोमवारी आणि पौर्णिमेला चंद्रदर्शन करून त्याचं पूजन करावं.

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राच्या अशुभ फळांऐवजी शुभ फळं मिळावीत यासाठी ॐ सो सोमाय नमः किंवा ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः या मंत्रांचा जप रुद्राक्ष किंवा मोत्याच्या माळेनं करावा. यामुळे चंद्राची शुभ फळं मिळतात. या शिवाय कुंडलीतील चंद्राचे दोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा फलदायी मानली गेली आहे. चंद्र हा भगवान शंकरांच्या डोक्यावर असतो. त्यामुळे भगवान शंकराची पूजा केल्यास कुंडलीतील चंद्राचा दोष दूर होतो आणि शुभ फळं मिळण्यास सुरूवात होते.

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये चंद्र जर कुंडलीत अशुभ असेल तर संबंधित व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चंद्राच्या दोषांमुळे जीवनात कलह कायम राहतो. चंद्राचा संबंध मन आणि भावनांशी असतो. त्यामुळे चंद्र अशुभ असेल तर संबंधित व्यक्तीचे मन कायम संभ्रमात असते. यामुळे शिक्षण, आरोग्य, नातेसंबंध आणि व्यापारावर परिणाम होतो. कुंडलीत चंद्र दोष असेल तर अशा व्यक्तींना नैराश्य, अपस्मार, ऋतुमानानुसार होणारे आजार या समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, वरील उपाय केल्यास चंद्राचे अशुभ परिणाम कमी होतात आणि समस्या दूर होतात.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope