मुंबई, 06 डिसेंबर : ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या अनेक उपायांसाठी लागणारी सामग्री आपल्या घरात सहज उपलब्ध असते. ज्योतिषशास्त्रातील उपायांनी माणसाच्या आयुष्यात सतत येणाऱ्या समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. लिंबू हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. लिंबू जेवणाची चव वाढवण्याचे काम करतोच, त्याशिवाय घराची स्वच्छता आणि सौंदर्य उपायांसाठी देखील वापरला जातो. लिंबू आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवून देऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात लिंबूशी संबंधित सांगितलेले उपाय पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया.
दृष्ट लागण्यावर उपाय
घरातील कोणत्याही व्यक्तीला वाईट नजर लागली असेल किंवा दृष्ट लागली असेल तर पीडित व्यक्तीवर 7 वेळा लिंबू उतरवून नंतर कापून तो निर्जन ठिकाणी टाकून द्या. यानंतर मागे वळून पाहू नका.
व्यवसायाला गती देण्यासाठी -
तुम्हाला तुमच्या व्यवसायात अडथळे येत असतील आणि आर्थिक फायदा मंदावला असेल तर 5 लिंबू कापून त्यात मूठभर पिवळी मोहरी आणि मूठभर काळी मिरी सोबत ठेवा. दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यानंतर हे सर्व साहित्य उचलून निर्जन ठिकाणी ठेवा, लाभ मिळेल.
कामात यश मिळवण्यासाठी उपाय -
जर तुम्हाला कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर रविवारी लिंबू घ्या. त्यात 4 लवंगा दाबून ‘ॐ श्री हनुमते नम:’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. यानंतर हा लिंबू रखडलेले काम पूर्ण करायला जाताना सोबत घ्या. तुमची कामे नक्कीच पूर्ण होतील.
हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा
नशीब बदलण्याचा उपाय
जर तुम्ही खूप मेहनत करूनही नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर तुमच्यावरून 7 वेळा लिंबू उतरवा. त्याचे दोन तुकडे करा. दोन्ही तुकडे विरुद्ध दिशेला फेकून द्या म्हणजे या आताचा तुकडा विरुद्ध बाजूला आणि त्या हाताचा त्याच्या विरुद्ध बाजूला, या तुम्हाला फायदा होईल.
वाचा - 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.