मराठी बातम्या /बातम्या /religion /

सकाळी घराबाहेर पडताना हळदीचे हे उपाय करून बघा; कामं झटपट लागतात मार्गी

सकाळी घराबाहेर पडताना हळदीचे हे उपाय करून बघा; कामं झटपट लागतात मार्गी

हळदीचे ज्योतिषीय उपाय

हळदीचे ज्योतिषीय उपाय

भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ हळदीचे असे कोणते उपाय आहेत, ज्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद मिळू शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 08 डिसेंबर : हळदीचा वापर आपल्याकडे सर्वांच्याच घरांमध्ये केला जातो. हळदीचा वापर केवळ मसाला म्हणून केला जात नाही तर देवतांच्या पूजेमध्येही हळद वापरली जाते. आयुर्वेदात हळदीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. हळद आरोग्यासाठी जितकी फायदेशीर मानली जाते तितकीच तिचं धार्मिक कार्यात महत्त्व आहे. हिंदू धर्मात लग्नादरम्यानही वधू-वरांना हळद लावण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अंगाला हळद लावल्यानं वधू-वर बाह्य अडचणींपासून वाचू शकतात आणि त्यांचे आरोग्य आणि सौंदर्य देखील वाढते. ज्योतिष शास्त्राबद्दल बोलायचे झाले तर हळदीचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ हळदीचे असे कोणते उपाय आहेत, ज्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद मिळू शकतो.

- आर्थिक संकटावर उपाय

धार्मिक श्रद्धेनुसार गुरुवारी भगवान विष्णूला हळद अर्पण करणे शुभ मानले जाते. भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आणि या विश्वाचे पालनपोषण करणारे आहेत. भगवान विष्णूला प्रसन्न केल्यानं माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांवर कधीही आर्थिक समस्या निर्माण होऊ देत नाही, असे मानले जाते.

- यशस्वी होण्याचा मार्ग

जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घराबाहेर जात असाल तर विशेषत: गुरुवारी घरातून बाहेर पडण्यापूर्वी गणपतीला हळदीचा टिळा लावा आणि नंतर स्वत: कपाळावर लावून घरातून बाहेर पडा. श्रद्धेनुसार असे केल्याने तुम्हाला तुमच्या शुभ कार्यात यश मिळेल.

- थांबलेली कामे पूर्ण करण्यासाठी उपाय

हळदीचा संबंध देव गुरू ग्रहाशी मानला जातो. गुरू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हरभऱ्याची डाळ, पिवळी कपडे, बेसनाचे लाडू आणि विशेषत: हळद यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू एखाद्या योग्य ब्राह्मणाला गुरुवारी दान कराव्यात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने व्यक्तीची रखडलेली कामे पूर्ण होतात.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion