मुंबई, 18 मार्च : कधी माणसाचा काळ चांगला असतो तर कधी वाईट. वेळ चांगली असेल तर माणसाने मातीत हात घातला तर तेथून सोनं हाताला लागू शकतं आणि वेळ वाईट असेल तर उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावू शकतो, असे म्हणतात. काळ कधीच सारखा नसतो. कठीण काळातून जाण्यासाठी वेळ लागतो.
सामान्यतः यश आणि प्रगती हे चांगले आणि वाईट काळ ठरवतात. वाईट काळ सुरू झाला की कामात अडचणी येऊ लागतात, यश मिळणे कठीण होते. वादविवाद, कोर्ट केस, आजारपण इत्यादींमुळे व्यक्ती त्रस्त होते. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी, आयुष्यातील चांगल्या काळाचे संकेत कसे असतात? चांगली वेळ येत असताना एखाद्या व्यक्तीला काय संकेत मिळतात. याविषयी सांगितले आहे.
चांगल्या काळ येणार असल्याचे 8 संकेत -
1. तुम्ही कुठेतरी जात असाल आणि वाटेत रस्त्यावर तुम्हाला पैसे मिळाले तर समजा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. अशा प्रकारे अचानक पैसा मिळणे, हे लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे.
2. जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की, आता चांगला काळ सुरू होणार आहे. तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता.
3. तुम्ही एखाद्या खास कामासाठी घरातून निघत आहात आणि जर तुम्हाला एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेला कलश दिसला तर ते खूप शुभ आहे.
4. प्रवास करताना किंवा घरातून बाहेर पडताना पूजेचा नारळ पाहणे देखील शुभ लक्षण आहे. हे कामाच्या यशाची शक्यता दर्शवणारे मानले जाते.
5. जर मदार वनस्पती म्हणजेच आक वनस्पती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वतःहून उगवत असेल तर समजावे की, चांगला काळ सुरू होणार आहे. ही वनस्पती शुभ मानली जाते.
6. चांगली वेळ येणार असल्यास रंगीबेरंगी फुलपाखरे तुमच्याभोवती घिरट्या घालू लागतात. हे देखील शुभ मानले जाते.
7. जर तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय घुटमळू लागली तर ते शुभ काळ सुरू होण्याचे लक्षण मानले जाते. तुम्ही तिला रोटी, गूळ इत्यादी खाऊ शकता.
8. घराबाहेर पडताना हिरव्या भाज्या, हिरवे गवत, पांढरे कबुतर इत्यादी पाहणे देखील शुभ असते.
हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.