मराठी बातम्या /बातम्या /religion /

स्वप्नात अशा मधमाशा दिसणे शुभ असतं की अशुभ, कधी ठरू शकतं चिंताजनक?

स्वप्नात अशा मधमाशा दिसणे शुभ असतं की अशुभ, कधी ठरू शकतं चिंताजनक?

जर कोणाला स्वप्नात मधमाशी दिसत असेल तर स्वप्न शास्त्रात त्याबद्दल काय वर्णन आहे, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.

जर कोणाला स्वप्नात मधमाशी दिसत असेल तर स्वप्न शास्त्रात त्याबद्दल काय वर्णन आहे, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.

जर कोणाला स्वप्नात मधमाशी दिसत असेल तर स्वप्न शास्त्रात त्याबद्दल काय वर्णन आहे, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 16 ऑगस्ट : स्वप्नांचे जग तसे खूप गूढ आहे. आपल्याला दिसणारी स्वप्ने चांगली आणि वाईट दोन्ही असू शकतात. स्वप्न पाहण्यावर माणसाचे नियंत्रण नसते. काही लोकांना खूप चांगली स्वप्ने पडतात, तर काही लोकांना अशी भयानक स्वप्ने देखील पडतात, ज्यामुळे त्यांची झोपच उडते. काही लोकांना स्वप्नात मधमाश्यासारखे काही प्राणी देखील दिसतात. जर कोणाला स्वप्नात मधमाशी दिसत असेल तर स्वप्न शास्त्रात त्याबद्दल काय वर्णन आहे, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत. स्वप्नात मधमाश्या पाहणे - स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात मधमाशी वारंवार दिसली तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. हे स्वप्न सूचित करते की, येते काही दिवस तुमच्यासाठी आनंदी असतील किंवा नवीन जीवन तुमच्यासाठी खास आहे. स्वप्नात मधमाशी चावणे - स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात मधमाशी चावल्याचे दिसणे हे दुर्दैवी मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, आगामी काळात तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. स्वप्नात खूप मधमाश्या दिसणे - जर तुम्हाला स्वप्नात अनेक मधमाश्या एकत्र दिसल्या तर ते तुमच्यासाठी एक शुभ स्वप्न असू शकते. स्वप्नात मधमाशांचा थवा पाहणे हे आपल्या यशाचे लक्षण आहे. आगामी काळात तुम्हाला तुमच्या कामात प्रचंड यश मिळेल, असा तो संकेत असू शकतो. स्वप्नात भरपूर मधमाशांचे पोळे दिसणे - स्वप्न विज्ञान मानते की, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मधमाशांचे पोळे दिसले तर ते तुमच्यासाठी आगामी काळात अमाप पैसा मिळू शकेल किंवा तुमचे अडकलेले पैसे अचानक मिळतील याचा संकेत आहे. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत मध तयार होताना दिसणे - जर तुम्हाला स्वप्नात मध तयार होताना दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला तुमच्या कामात अपार यश मिळेल. तुमच्या यशासाठी तुम्हाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. त्यामुळे समाजात तुमचा दर्जाही वाढेल. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या