मराठी बातम्या /बातम्या /religion /फेब्रुवारीमध्येही आहेत चिक्कार मुहूर्त! या दिवसांमध्ये उडवून देऊ शकता लग्नाचा बार

फेब्रुवारीमध्येही आहेत चिक्कार मुहूर्त! या दिवसांमध्ये उडवून देऊ शकता लग्नाचा बार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विवाहासाठी फेब्रुवारी महिन्यातदेखील खास मुहूर्त आहेत. 2023 या वर्षाचा विचार करता, जानेवारी ते डिसेंबरदरम्यान विवाहासाठी एकूण 64 मुहूर्त आहेत. यातील फेब्रुवारी महिन्यात असलेले मुहूर्त पाहुया.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 फेब्रुवारी : हिंदू धर्मात विवाह हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे विवाहासाठी योग्य मुहूर्त पाहिला जातो. वधू-वराचं वैवाहिक आयुष्य सुखमय व्हावं हा यामागचा प्रमुख उद्देश असतो. दर वर्षी ठरावीक कालावधीत विवाहासाठी योग्य मुहूर्त असतात. त्यामुळे या कालावधीत विवाह करण्याकडे अनेकांचा कल असतो. विवाहासाठी गुरू आणि शुक्राचा उदय महत्त्वाचा मानला जातो. तसंच मलमासात विवाहासह कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. यंदा दोन वेळा मलमास असल्याने या कालावधीत विवाहासाठी मुहूर्त नाहीत.

जानेवारीत मकर संक्रांतीनंतर शुभकार्यांना प्रारंभ झाला आहे. जानेवारीत विवाहमुहूर्त असल्याने मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे पार पडले. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. या महिन्यात विवाहमुहूर्त कोणत्या दिवशी आहेत, ते जाणून घेऊया.

जानेवारीत मकर संक्रांतीनंतर शुभकार्याला प्रारंभ झाला आहे. विवाहासाठी फेब्रुवारी महिन्यातदेखील खास मुहूर्त आहेत. 2023 या वर्षाचा विचार करता, जानेवारी ते डिसेंबरदरम्यान विवाहासाठी एकूण 64 मुहूर्त आहेत. ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार विवाहासाठी गुरू आणि शुक्राचं बळ असणं गरजेचं आहे. या ग्रहांच्या उदयकाळात विवाह आणि शुभकार्यं होऊ शकतात. गुरू आणि शुक्राचा अस्त असेल तर कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. यामध्ये प्रामुख्याने विवाह, गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसारख्या शुभकार्यांचा समावेश असतो.

तसंच मलमास विवाहासाठी वर्ज्य समजला जातो. मलमासात कोणतीही शुभकार्यं होत नाहीत. 2023मध्ये दोन वेळा मलमास कालावधी असेल. त्यात पहिला मलमास 15 मार्च ते 14 एप्रिलदरम्यान असेल. या कालावधीत सूर्य मीन राशीत असेल. यंदा दुसरा मलमास 16 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान असेल. या कालावधीत विवाहासह कोणतंही शुभकार्य करता येणार नाही.

हे वाचा - नोकरी, व्यवसायासाठी शुभकाळ; सूर्याचं राशीपरिवर्तन या राशींना देईल 'छप्पर फाडके'

फेब्रुवारी 2023मध्ये 6 तारखेपासून विवाहासाठी खास मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात एकूण 13 मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात 6 ते 10, 13 ते 17 या प्रत्येक दिवशी, तसंच 22, 23 आणि 28 फेब्रुवारीला विवाहासाठी उत्तम मुहूर्त आहेत. हे सर्व मुहूर्त शुभ असल्याने विवाहासाठी यापैकी एक मुहूर्त निवडू शकता. या कालावधीत गुरू आणि शुक्राचा उदय असल्याने विवाहासह अन्य शुभकार्यं करता येऊ शकतात, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.

First published:

Tags: Lifestyle, Marriage