- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
Shravan Putrada Ekadashi : पुत्रदा एकादशीला तयार झालाय रवी योग; उपवास करणाऱ्यांना होईल दुहेरी फायदा

यंदा श्रावण पुत्रदा एकादशी सोमवारी 8 ऑगस्ट रोजी आहे. हा दिवस श्रावण महिन्यातील दुसरा सोमवारदेखील आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव म्हणजेच हरिहर यांची पूजा करण्याचा सर्वोत्तम योग आहे.
- News18 Lokmat
- Last Updated: Aug 5, 2022 01:33 AM IST
मुंबई, 05 ऑगस्ट : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. श्रावण महिन्यात असल्याने तिला श्रावण पुत्रदा एकादशीदेखील म्हणतात. पौष महिन्यात दुसरी पुत्रदा एकादशी येते, तिला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. यंदा श्रावण पुत्रदा एकादशी सोमवारी 8 ऑगस्ट रोजी आहे. हा दिवस श्रावण महिन्यातील दुसरा सोमवारदेखील आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव म्हणजेच हरिहर यांची पूजा करण्याचा सर्वोत्तम योग आहे. हे दोन्ही व्रत एकाच दिवशी असून दोन्ही व्रत केल्याने पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून श्रावण पुत्रदा एकादशीला तयार होणारा रवि योग आणि या व्रताचे फायदे जाणून (Shravana Putrada Ekadashi 2022) घेऊयात.
श्रावण पुत्रदा एकादशी मुहूर्त 2022 -
श्रावण शुक्ल एकादशीची सुरुवात : 07 ऑगस्ट, रविवार, रात्री 11:50
श्रावण शुक्ल एकादशी तिथीची समाप्ती : 08 ऑगस्ट, सोमवार, 09:00 रात्री
श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची पारण वेळ: 09 ऑगस्ट, मंगळवार, सकाळी 05:47 ते सकाळी 8:27
द्वादशी तिथीची समाप्ती: ऑगस्ट 09, 05:45 संध्याकाळी
रवियोगातील श्रावण पुत्रदा एकादशी व्रत -
श्रावण पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी 05:46 ते दुपारी 02:37 पर्यंत रवि योग आहे. अशा स्थितीत रवियोगात श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची पूजा करून कथा श्रवण केल्यास आपले इच्छित कार्य सफल होईल. रवियोग वाईटाचा नाश करून यश मिळवून देतो. या योगात सूर्य देवाचे प्रभुत्व राहते.
हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा
श्रावण पुत्रदा एकादशी व्रताचे फायदे -
1. जो कोणी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत करून भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला सर्व सुख-समृद्धी प्राप्त होते.
2. जे निपुत्रिक आहेत, त्यांना पुत्रप्राप्ती होते.
3. जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान मिळतं, ते विद्वान होतात.
4. जे गरीब आहेत, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहते. त्यांच्या आयुष्यातील पैशाची कमतरता दूर होते.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
श्रावण पुत्रदा एकादशीला श्रावण सोमवारचा योगायोग -
यावेळी श्रावण पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रावण सोमवार व्रताचा योगायोग आहे. श्रावण पुत्रदा एकादशी व्रत आणि श्रावण सोमवार व्रत, हे दोन्ही उपवास पुत्रप्राप्तीच्या इच्छेने पाळले जातात. या दिवशी व्रत पाळल्यास दोन्ही व्रतांचे पुण्य मिळवता येते. श्रावण सोमवार व्रताने इच्छित जीवनसाथी मिळण्याची इच्छा पूर्ण होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)