मराठी बातम्या /बातम्या /religion /आजचा शनिवार आहे खास! शनिकृपेसाठी करा या 5 गोष्टी, साडेसातीचाही नाही होणार त्रास

आजचा शनिवार आहे खास! शनिकृपेसाठी करा या 5 गोष्टी, साडेसातीचाही नाही होणार त्रास

शनिवारची पूजा

शनिवारची पूजा

शनिवार हा शनिदेव आणि हनुमानाची पूजा करण्याचा दिवस आहे. आज पापमोचनी एकादशीचे व्रतही आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, श्रवण नक्षत्र यासह 4 शुभ संयोग होत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च : आज शनिवारी 4 शुभ संयोग तयार होत आहेत, ज्यामध्ये शनिदेवाची पूजा केल्यानं साडेसाती प्रकोपापासून मुक्ती मिळू शकते. शनिवार हा शनिदेव आणि हनुमानाची पूजा करण्याचा दिवस आहे. आज पापमोचनी एकादशीचे व्रतही आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, श्रवण नक्षत्र यासह 4 शुभ संयोग होत आहेत. यामध्ये शनीची पूजा केल्यानं आपल्या मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्याला संकटांपासूनही मुक्ती मिळेल.

शनिवारी श्रवण नक्षत्राचा संयोग -

काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, 18 मार्चला शनिवारी श्रवण नक्षत्र पूर्ण दिवसभर आहे. श्रवण नक्षत्राचे सर्व चरण मकर राशीत आहेत आणि या नक्षत्राचा स्वामी शनीदेव आहे. तो मकर राशीचाही स्वामी आहे. या नक्षत्रावर शनीचा प्रभाव आहे. शनिवार आणि श्रवण नक्षत्र हे शनिदेवाची उपासना आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी शुभ आहेत.

सर्वार्थ सिद्धी योगासह 3 शुभ योग -

शनिवारी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 06:28 ते रात्री 12:29 पर्यंत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात तुम्ही ज्या काही इच्छा ठेवून शनिदेवाची पूजा कराल, ती शनिदेव पूर्ण करतील. सर्वार्थ सिद्धी योगात केलेली कामे यशस्वी होतात, असे मानले जाते.

शनि उपाय -

1. या शनिवारी बरेच शुभ संयोग असल्यानं आज शनिदेवाची पूजा करणं अधिक लाभदायी ठरेल. त्यांना काळे तीळ, मोहरीचे तेल, निळे वस्त्र इत्यादी अर्पण करा. शनि चालिसाचे पठण करा. शनिदेव आपल्याला संकटांपासून मुक्ती देतील.

2. शनिवारी शनि रक्षा स्तोत्राचे पठण करणे देखील फायदेशीर ठरेल. त्यानंतर साडेसाती किंवा इतर शनिदोषांपासून रक्षणासाठी शनिदेवाची प्रार्थना करावी.

3. शनिवारी काळी छत्री, काळी घोंगडी, उडीद, शनी चालीसा, काळे तीळ, चंदन इत्यादी वस्तू गरीब किंवा गरजू लोकांना दान करा. या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, असे मानले जाते.

4. शनिवारी काळ्या कुत्र्याला तेलात मळलेली भाकरी खाऊ घातल्यास त्याचाही फायदा होतो.

हे वाचा - विश्वासूच षडयंत्र रचतील! सूर्याच्या संक्रमणात या 4 राशीच्या लोकांनी सावध रहा

5. शनिवारी पिंपळाच्या झाडाची किंवा शमीच्या झाडाची पूजा करा, पाणी आणि मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेव प्रसन्न राहतील.

याशिवाय शनिवारी सकाळपासून रात्री 11.54 पर्यंत शिवयोग आहे. ध्यान, तपस्या इत्यादींसाठी शिवयोग सर्वोत्तम आहे. शिवयोगानंतर सिद्ध योग होईल.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu