मराठी बातम्या /बातम्या /religion /

म्हणून शनिवारी हनुमानाची पूजा केली जाऊ लागली; शनिदेवाशी त्याचा असा आहे संबंध

म्हणून शनिवारी हनुमानाची पूजा केली जाऊ लागली; शनिदेवाशी त्याचा असा आहे संबंध

शनिवारी शनिदेवाची तसेच हनुमानजींची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि या दिवशी हनुमानाची पूजा केल्यास शनिदेवही प्रसन्न होतात. याबाबत असलेल्या अध्यात्मिक गोष्टी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 23 जुलै : हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेची उपासना आणि उपवास करण्यासाठी समर्पित आहे. जसा रविवारचा दिवस सूर्यदेवाचा, बुधवारचा दिवस गणपतीचा, सोमवारचा दिवस शिवाचा. तसेच शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि मंगळवार हा हनुमानाच्या पूजेसाठी समर्पित आहे, परंतु शनिवारी शनिदेवाची तसेच हनुमानजींची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि या दिवशी हनुमानाची पूजा केल्यास शनिदेवही प्रसन्न होतात. शनिवारी हनुमानाची पूजा करण्यामागे एक आख्यायिका आहे. शनिवारी शनिदेव आणि हनुमानजींच्या पूजेशी संबंधित ही पौराणिक कथा दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून (Shani Dev Katha) घेऊया. शनिदेव आणि हनुमान यांच्याशी संबंधित पौराणिक कथा शनिदेव आणि हनुमानजींची ही पौराणिक कथा त्रेतायुगातील रामायण काळाशी संबंधित आहे, त्यानुसार जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, तेव्हा भगवान रामाच्या आदेशानुसार हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले. लंकेत पोहोचल्यावर हनुमानजींनी पाहिले की रावणाने शनिदेवाला आधीच कैद केले आहे. हनुमानजींनी शनिदेवाला मदत करून रावणाच्या कैदेतून मुक्त केले. यावर भगवान शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानजींना वरदान मागायला सांगितले. हनुमानजी शनिदेवाला म्हणाले, जो भक्त शनिवारी माझी पूजा करतो, त्याला तू अशुभ फळ देणार नाहीस. हनुमानजींचे म्हणणे शनिदेवाने मान्य केले. तेव्हापासून शनिवारी शनिदेवासह हनुमानजीची पूजा करण्याचा नियम रुढ झाला, असे सांगितले जाते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर शनिवारी उपासना करणार्‍या भक्तांवर हनुमान आणि शनिदेवाची कृपा कायम राहते, त्यामुळे जो भक्त श्रद्धेने आणि भक्तीभावाने हनुमानाची उपासना करतो त्यांना शनिदेवाच्या साडेसातीच्या त्रासापासून सुटका मिळते. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Hanuman, Religion

पुढील बातम्या