मराठी बातम्या /बातम्या /religion /शनि अस्तामध्ये आपल्या हातून घडू नयेत या चुका; नंतर वाईट काळ सहनही नाही होणार

शनि अस्तामध्ये आपल्या हातून घडू नयेत या चुका; नंतर वाईट काळ सहनही नाही होणार

शनी अस्त काळ परिणाम

शनी अस्त काळ परिणाम

शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. चुकीचे कर्म केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील आणि योग्य कर्म केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होईल. शनिच्या अस्त काळात..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : कर्मफळदाता शनिदेव 31 जानेवारी रोजी पहाटे 02:46 वाजता अस्ताला गेला. शनिदेव स्वतःच्या गृह राशी म्हणजे कुंभ राशीत आहेत. शनी आता 33 दिवस कुंभ राशीत अस्त स्थितीत राहील. त्यानंतर 05 मार्च रोजी रात्री 08:46 वाजता शनीचा कुंभ राशीतच उदय होईल. या 33 दिवसांमध्ये ज्या राशींवर शनिदेवाचा अशुभ प्रभाव पडू शकतो किंवा ज्यांच्यावर शनीची साडेसाती, किंवा शनिदोष आहे, अशा लोकांनी शनीच्या मावळतीमध्ये कोणतेही चुकीचे काम करू नये. त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या मते, शनि हा असा देव आहे, जो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. चुकीचे कर्म केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील आणि योग्य कर्म केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होईल. शनीच्या अस्तामुळे लोकांनी काही वाईट सवयींपासून दूर राहावे.

1. मांस किंवा तामसिक अन्न टाळा

जे मांसाहार करतात किंवा तामसिक आहार घेतात, त्यांनी ते या काळात सोडून द्यावे, अन्यथा शनिदेव आपल्यावर कोपतील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही.

2. दारू-जुगार टाळा

जे लोक दारूचे सेवन करतात किंवा जुगार खेळतात, अशा लोकांवर शनिदेव क्रोधित होतात. शनीचा प्रकोप टाळण्यासाठी दारू, जुगार यापासून या काळात जाणीवपूर्वक दूर राहा.

3. ज्येष्ठांचा अनादर करू नका

जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा आदर करत नसाल, वडिलांचा अपमान करत असाल, ज्येष्ठांचा अपमान करण्याचा प्रयत्न कराल तर ही सवय बदला, नाहीतर शनिदेव तुमच्यावर नाराज होतील आणि तुमचे जीवन कठीण होईल.

4. प्राण्यांवर अत्याचार करू नका

अनेकवेळा जाणूनबुजून किंवा नकळत लोक इतर सजीवांना विनाकारण त्रास देतात, मारहाण करतात, असे करू नका. मूक जीवांवर अत्याचार करणाऱ्यांवरही शनीची वक्र दृष्टी पडत असते.

5. या लोकांना योग्य वागणूक द्या

जे लोक त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करतात, सफाई कामगार, रुग्ण, असहाय्य, गरीब इ. अशा लोकांवर शनीची थेट दृष्टी असते. अशा लोकांवर शनीची साडेसाती सुरू होते, तेव्हा शनिदेव त्यांना त्यांच्या कर्माचे फळ बरोबर देतात.

हे वाचा - सोमवारी उपवास करण्याऱ्यांनी या चुका टाळा; महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion