मराठी बातम्या /बातम्या /religion /

सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांचे हे 5 गुण असतात गॉड गिफ्ट, असा असतो स्वभाव

सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांचे हे 5 गुण असतात गॉड गिफ्ट, असा असतो स्वभाव

काही मुले लहानपणापासूनच खूप हुशार आणि चाणाक्ष असतात, तर काही खूपच शांत स्वभावाचे असतात. सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या मुलांचे कोणते गुण असतात, याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 सप्टेंबर : खरंतर ज्या घरात मुले असतात ते घर स्वर्गासारखे असते. मुलांचे बोबडे बोल, त्याचा आवाज घरात आनंद आणतात. प्रत्येक मूल स्वतः खास असते. जन्मतारीख आणि ग्रह राशींमुळे प्रत्येक मुलाचा स्वभाव एकमेकांपेक्षा वेगळा असतो. एखादे मुल आनंदी असते तर काहींचा कल रागीट असतो. काही लहानपणापासूनच खूप हुशार आणि चाणाक्ष असतात, तर काही खूपच शांत स्वभावाचे असतात. सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या मुलांचे कोणते गुण असतात याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत. 1. हळवे मन पण मजबूत स्वभाव - सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक मनाने खूप हळवे असतात आणि ते खूप भावनिकही मानले जातात. मात्र, जेव्हा एखाद्या बाहेरच्या व्यक्तीशी वादाचा प्रसंग येतो तेव्हा ते त्यांच्यासमोर स्वत: ला जोरदारपणे सादर करतात. 2. सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक मेहनती - सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्यांना सहजासहजी काहीही मिळत नाही. यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक कष्टाळू असण्याबरोबरच ते ठरवलेली कामे केल्यानंतरच श्वास घेतात. 3. हुशार आणि लाजाळू असतात - सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचा रंग गव्हाळ आणि उंची सरासरी असते. त्यांच्यात स्मार्ट व्यक्तिमत्व असते आणि ते स्वभावाने लाजाळू असतात. त्यामुळे ते त्यांची कोणतीही गोष्ट लवकर कोणाशीही शेअर करत नाहीत. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान 4. रागीट असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक केवळ आनंदी नसतात तर खूप रागावतात देखील. सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांना खूप लवकर राग येतो, त्यामुळे ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि लगेच आपला राग इतरांसमोर व्यक्त करतात. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं 5. परिपूर्णता असते - ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरमध्ये जन्मलेली मुले सर्जनशील असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आवडते. ते कोणतेही काम करण्यात पटाईत असतात आणि त्यामुळे सर्वांमध्ये खूप लोकप्रिय बनतात. त्यांचे मेंदू तीक्ष्ण असतो, त्यामुळे ते प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने घेतात.
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या