मराठी बातम्या /बातम्या /religion /

September 2022 Festivals : अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, शारदीय नवरात्रोत्सव; ही आहे सप्टेंबरमधील सणांची यादी

September 2022 Festivals : अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, शारदीय नवरात्रोत्सव; ही आहे सप्टेंबरमधील सणांची यादी

ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिनाही उपवास आणि सणांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, शारदीय नवरात्रोत्सव सप्टेंबरमध्ये येणार आहेत.

ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिनाही उपवास आणि सणांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, शारदीय नवरात्रोत्सव सप्टेंबरमध्ये येणार आहेत.

ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिनाही उपवास आणि सणांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, शारदीय नवरात्रोत्सव सप्टेंबरमध्ये येणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 2 सप्टेंबर : इंग्रजी कॅलेंडरचा नववा महिना सप्टेंबर ऋषी पंचमीपासून सुरू झाला आहे. पंचांगानुसार हा दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी आहे. ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर महिनाही उपवास आणि सणांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, अनंत चतुर्दशी, पितृपक्ष, शारदीय नवरात्रोत्सव सप्टेंबरमध्ये येणार आहेत. याशिवाय भागवत एकादशी, इंदिरा एकादशी, भाद्रपद पौर्णिमा, अश्विन अमावस्या, प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री हे व्रतही येतील. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव सांगत आहेत की सप्टेंबर महिन्यात कोणते उपवास आणि सण येणार आहेत.

सप्टेंबर 2022 चे प्रमुख उपवास आणि सण

01 सप्टेंबर, दिवस : गुरुवार : ऋषी पंचमी

03 सप्टेंबर, दिवस : शनिवार : ज्येष्ठा गौरी आवाहन

04 सप्टेंबर, दिवस : रविवार : ज्येष्ठा गौरी पूजन

05 सप्टेंबर, दिवस : सोमवार : ज्येष्ठा गौरी विसर्जन

07 सप्टेंबर, दिवस : बुधवार : भागवत एकादशी

08 सप्टेंबर, दिवस : गुरुवार : गुरु प्रदोष व्रत

09 सप्टेंबर, दिवस : शुक्रवार : गणेश विसर्जन किंवा अनंत चतुर्दशी

10 सप्टेंबर, दिवस : शनिवार : भाद्रपद पौर्णिमा, प्रौढषष्टी पौर्णिमा, पितृपक्ष आरंभ, प्रतिपदा श्राद्ध

स्वप्नात जळणारा किंवा विझलेला दिवा दिसण्याचा काय अर्थ? भविष्याचे मिळतात असे संकेत

13 सप्टेंबर, दिवस : मंगळवार : अंगारिका संकष्टी चतुर्थी

21 सप्टेंबर, दिवस : बुधवार : इंदिरा एकादशी

23 सप्टेंबर, दिवस : शुक्रवार : शुक्र प्रदोष व्रत

24 सप्टेंबर, दिवस : शनिवार : अश्विन शिवरात्री

25 सप्टेंबर, दिवस : रविवार : सर्वपित्री अमावस्या, अश्विन अमावस्या

26 सप्टेंबर, दिवस : सोमवार : घटस्थापना किंवा कलश स्थापना, शारदीय नवरात्रोत्सव सुरुवात

27 सप्टेंबर, दिवस : मंगळवार : चंद्रदर्शन, वर्ल्ड टुरिजम डे

29 सप्टेंबर, दिवस : गुरुवार : विनायक चतुर्थी

30 सप्टेंबर, दिवस : शुक्रवार : ललिता पंचमी

पितृ पक्ष 2022 : पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये 15 दिवस पितरांसाठी स्नान, दान, श्राद्ध कर्म, तर्पण, पिंड दान, ब्राह्मण भोजन इत्यादी उपक्रम असतील. असे केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि त्यांना सुखी जीवनासाठी आशीर्वाद देतात. ज्या लोकांचे पूर्वज त्या तिथीला मरण पावले आहेत, ते त्या तिथीला तर्पण, श्राद्ध विधी करतात.

येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

शारदीय नवरात्री 2022 : यावर्षी 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात कलशाच्या स्थापनेने होणार असून, त्यामध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. या दिवसाला दसराही साजरा केला जातो.

First published:

Tags: Culture and tradition, Festival, Lifestyle, Religion