मुंबई, 6 ऑगस्ट : आपल्याकडे अनेक कामे करण्यासाठी काही वेळा आणि स्थान नेमून दिलेले असतात. काहीवेळा त्या केवळ मान्यता असतात. तर काहीवेळा त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील असतात. रात्रीच्यावेळी केस आणि नखं कापू नये असं आपल्याकडे बोलला जात. आपण बऱ्यापैकी या नियमाचे पालनही करतो. मात्र तुम्ही कधी विचार कए आहे का की, ही केवळ एक अंधश्रद्धा आहे की यामागे काही वैज्ञानिक कारणदेखील आहे. आज आम्ही तुम्हाला याचेच उत्तर देणार आहोत.
रात्रीच्यावेळी केस आणि नखं न कापण्याचे धार्मिक कारण
झी न्यूजने याबद्दल सविस्तर महिती दिली आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की रात्री केस आणि नखं कापू नयेत. कारण रात्री केस आणि नखं कापल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे सहसा रात्रीच्यावेळी केस आणि नखं कापण्यास मनाई असते.
सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करण्यासोबच या गोष्टी पण करा; शुभ परिणाम दिसू लागतील
वैज्ञानिक कारण
रात्री केस आणि नखं न कापण्यामागे एक वैज्ञानिक कारणदेखील आहे. रात्रीच्या वेळी आपण खाणे, पिणे, चालणे आणि झोपणे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी करतो. अशा स्थितीत कापलेले केस आणि नखं कुठेही पडू शकतात. त्यामुळे अनेक वेळा अन्नपदार्थांवर केस गाळाने किंवा त्यामध्ये एखादे नख पडणे. अशा गोष्टी घडू शकतात आणि त्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.
Gemstone : कोणत्या बोटात कोणतं रत्न घालावं; योग्य दिवस आणि शुभ वेळ जाणून घ्या
पूर्वीच्या काळी हे नियम फार कडक होते आणि ते योग्यही होते. कारण त्यावेळी घरांमध्ये प्रकाशाची चांगली व्यवस्था नसायची. रात्रीच्यावेळी जास्त प्रकाश नसल्यामुळे केस, नखं कापणं अशी कामं सूर्यप्रकाशातच केली जायची. कारण अंधारात दुखापत होण्याची शक्यता होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Religion