मराठी बातम्या /बातम्या /religion /

रवियोगात साजरी होणार विनायक चतुर्थी; महादेव आणि गणेशाच्या पूजेचा जुळलाय सुंदर योग

रवियोगात साजरी होणार विनायक चतुर्थी; महादेव आणि गणेशाच्या पूजेचा जुळलाय सुंदर योग

विनायक चतुर्थीला भगवान शंकर आणि त्यांचा धाकटा पुत्र गणेशजी यांच्या पूजेचा सुंदर योगायोग जुळून आला आहे. या दिवशी उपवास करून भगवान शिव आणि गणेश या दोघांचेही आशीर्वाद मिळू शकतात.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 29 जुलै : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत केलं जाईल. यावेळी श्रावणातील विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi) सोमवारी 1 ऑगस्ट रोजी रवियोगात साजरी होणार आहे. या दिवशी श्रावण सोमवारचा उपवासही असतो. या दिवशी भगवान शंकर आणि त्यांचा धाकटा पुत्र गणेशजी यांच्या पूजेचा सुंदर योगायोग जुळून आला आहे. या दिवशी उपवास करून भगवान शिव आणि गणेश या दोघांचेही आशीर्वाद मिळू शकतात. शिव परिवाराची पूजा करण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो. अशा परिस्थितीत विनायक चतुर्थीचा दिवस आपल्यासाठी खास आहे. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून विनायक चतुर्थीला तयार होणारा योग आणि या दिवशी चंद्रदर्शनास प्रतिबंध याविषयी माहिती (Sawan Vinayaka Chaturthi 2022) जाणून घेऊया. विनायक चतुर्थी 2022 मुहूर्त - श्रावण शुक्ल चतुर्थीची सुरुवात तारीख : 1 ऑगस्ट, सोमवार, सकाळी 04:18 पासून श्रावण शुक्ल चतुर्थी तिथीची समाप्ती: 02 ऑगस्ट, मंगळवार, 05:13 वा. रवि योगाची सुरुवात: 01 ऑगस्ट, सकाळी 5:42 रवि योगाचा समारोप: 01 ऑगस्ट, दुपारी 04:06 वाजता गणेश पूजनाची शुभ वेळ: सकाळी 11:06 ते दुपारी 01.48 पर्यंत रवि योगाचे महत्व - रवि योगामध्ये सूर्यदेवाचा प्रभाव खूप जास्त असतो, यामुळे त्या योगात केलेली सर्व कामे शुभ फळ देणारी असतात. या योगाने वाईट गोष्टी दूर होतात. रवियोगात श्री गणेशाची पूजा करून आपण मनोकामना पूर्ण करू शकता आणि कोणत्याही कार्यात यश मिळवू शकता. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये? याचे कारण द्वापार युगातील भगवान श्रीकृष्णाशी संबंधित एक घटना मानली जाते. एकदा भगवान श्रीकृष्णांनी विनायक चतुर्थीला चंद्र पाहिला होता, त्यामुळे त्यांच्यावर स्यामंतक रत्न चोरल्याचा खोटा आरोप लावला गेला. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा हे खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी जामवंताशी अनेक दिवस युद्ध करावे लागले होते. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण या खोट्या कलंकातून मुक्त झाले आणि जामवंतने आपली मुलगी जामवंतीचा विवाह श्रीकृष्णाशी केला. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक माहितीवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion

पुढील बातम्या