Narali Purnima 2022: आज राखी पौर्णिमेला ही कामं न चुकता करावीत, धन-धान्याची होते नेहमी भरभराट

Narali Purnima 2022: आज राखी पौर्णिमेला ही कामं न चुकता करावीत, धन-धान्याची होते नेहमी भरभराट

कुटुंबात सुख-समृद्धी वाढावी, यासाठी भगवान शिव, माता लक्ष्मीसह भगवान नारायण यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात महादेवासह लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने पुण्य लाभ आणि धनात वृद्धी होते.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच श्रावणी पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.38 पासून सुरू होईल आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07:05 पर्यंत राहील. श्रावण महिन्यातील हा दिवस शिवभक्तांसाठीही खूप खास आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दानधर्म करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी पितरांना प्रसाद अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिवासोबत लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा करणे उत्तम. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया श्रावण पौर्णिमेच्या पवित्र तिथीचे महत्त्व आणि त्यासंबंधीचे अनेक धार्मिक उपाय.

भगवान नारायण पूजेचे महत्व -

कुटुंबात सुख-समृद्धी वाढावी, यासाठी भगवान शिव, माता लक्ष्मीसह भगवान नारायण यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात महादेवासह लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने पुण्य लाभ आणि धनात वृद्धी होते.

देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावण पौर्णिमेला लक्ष्मीला 11 पिवळ्या कवड्या अर्पण कराव्यात. यानंतर या सर्व 11 कवड्या दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने कुटुंबातील आर्थिक विवंचना दूर होतात. सुख-समृद्धी वाढते आणि घरात माता लक्ष्मी वास करते.

हे वाचा - Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश

श्रावण पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा -

धार्मिक नियमानुसार श्रावण पौर्णिमेला चंद्रदेवतेची पूजा केल्यास इच्छित वरदान मिळू शकते. ज्योतिषांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र दोष असेल तर या उपायांनी दोषांपासून मुक्त होऊ शकता. यासाठी श्रावण पौर्णिमेला चंद्रदेवाला दूध आणि गंगाजल अर्पण करणे शुभ मानले जाते.

हे वाचा -  Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 11, 2022, 8:53 AM IST

ताज्या बातम्या