Sankashti 2022: श्रावणी सोमवारच्या दिवशीच आलीय संकष्टी! चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

Sankashti 2022: श्रावणी सोमवारच्या दिवशीच आलीय संकष्टी! चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 09:27 वाजता चंद्र उगवेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09:04 वाजता मावळेल. मात्र, आपल्या शहरानुसार चंद्रोदयाची अचूक वेळ येथे जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. यंदा भाद्रपद संकष्टी चतुर्थी 15 ऑगस्टला आहे. तिला हेरंब संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. संकष्टी चतुर्थीचा अर्थ त्रास दूर करणारी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवून श्रीगणेशाची आराधना केल्याने संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि सुख व सौभाग्य वाढते. या दिवशी भगवान श्रीकृष्णासह गायीची पूजा करण्याचा नियम आहे. चंद्रोदयाच्या आपल्या शहरातील (Sankashti Chaturthi) वेळा जाणून घेऊया.

भाद्रपद संकष्टी चतुर्थी 2022 -

पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 14 ऑगस्ट रविवारी रात्री 10.35 सुरू होईल. सोमवार 15 ऑगस्ट रोजी रात्री 09:01 वाजता संपेल. त्यामुळे भाद्रपद संकष्टी चतुर्थी 15 ऑगस्ट रोजी उदयती तिथी म्हणून साजरी केली जाईल.

संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय वेळ -

भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 09:27 वाजता चंद्र उगवेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09:04 वाजता चंद्र मावळेल. जे संकष्टी चतुर्थीला उपवास ठेवतील, त्यांनी रात्री 09:27 वाजता चंद्राला जल अर्पण करून उपवास सोडावा.

तुमच्या शहरानुसार वेळा -

मुंबई - 9.44

अमरावती - 9.24

अकोला - 9.27

अलिबाग - 9.44

अहमदनगर - 9.36

औरंगाबाद - 9.34

कोल्हापूर - 9.39

कराड - 9.38

जळगाव - 9.33

चंद्रपूर - 9.17

भंडारा - 9.16

बुलढाणा - 9.30

जालना -9.31

लातूर - 9.29

धारवाड - 9.35

धुळे - 9.36

नाशिक - 9.40

नागपूर - 9.18

नांदेड - 9.25

पुणे - 9.40

परभणी - 9.28

पणजी - 9.40

पंढरपूर - 9.34

रत्नागिरी - 9.42

वर्धा - 9.20

सातारा - 9.39

सांगली - 9.37

सावंतवाडी - 9.40

सोलापूर - 9.32

बीड - 9.32

भुसावळ - 9.32

ठाणे - 9.43

विजापूर - 9.32

बारामती - 9.37

मनमाड - 9.37

बेळगाव - 9.38

गाणगापूर - 9.28

निपाणी - 9.38

उस्मानाबाद - 9.29

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

भाद्रपद संकष्टी चतुर्थी 2022 मुहूर्त -

15 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 11:59 ते दुपारी 12:52 पर्यंत अभिजित मुहूर्त आहे. हा या दिवसाचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी सकाळपासून रात्री 11.24 पर्यंत धृति योग असतो. बहुतेक कामांमध्ये हा काळ शुभ मानला जातो.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

संकष्टी चतुर्थी व्रताची पूजा सकाळी करावी. तथापि, रात्री चंद्र उगवण्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. कारण, चतुर्थीचा उपवास केवळ रात्री चंद्राची पूजा केल्यावरच पूर्ण मानला जातो. पुजेसाठी राहु काळ वर्ज्य आहे. या काळात फक्त काही विशेष पूजा केली जाते.

Published by: News18 Desk
First published: August 14, 2022, 8:00 PM IST

ताज्या बातम्या