मुंबई, 11 मार्च: चैत्र महिना 8 मार्चपासून सुरू झाला असून तो 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या महिन्यात कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी 11 मार्च रोजी आहे. या दिवशी गणपतीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. स्कंद आणि ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या तिथीला गणेशाची विशेष उपासना करून उपवास केल्यास संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
संकष्टी गणेश चतुर्थी व्रत शनिवारी येत आहे. या दिवशी चतुर्थी तिथी दिवसभर राहून रात्री 10 वाजेपर्यंत राहील. संकष्टी गणेश चतुर्थी व्रत फक्त चंद्रोदय व्यापिनी चतुर्थीला पाळले जाते. म्हणजेच चतुर्थी तिथीला संध्याकाळी चंद्र उगवला, तर त्या दिवशी उपवास करावा. या व्रतामध्ये सूर्योदयाच्या वेळी कोणती तिथी आहे याचा विचार केला जात नाही.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. हे व्रतही नावाप्रमाणे आहे. म्हणजेच ते सर्व संकटांना निवारणारे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते.
संकष्टी चतुर्थी व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी पाळतात. त्याचप्रमाणे, अविवाहित मुलीदेखील चांगला पती मिळावा म्हणून दिवसभर उपवास करून संध्याकाळी गणपतीची पूजा करतात.
संकष्टी चतुर्थी उपवास पद्धत
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्याला जल अर्पण केल्यानंतर श्रीगणेशाचे दर्शन घ्यावे. गणेशमूर्तीसमोर बसून दिवसभर उपवास व पूजा करण्याची प्रतिज्ञा घ्यावी. या व्रतामध्ये दिवसभर फक्त फळे आणि दूध घ्यावे. अन्न खाऊ नये. अशा प्रकारे व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात. गणपतीची सकाळ व संध्याकाळ पूजा करावी. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रत पूर्ण करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Ganesh chaturthi, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion