मराठी बातम्या /बातम्या /religion /आज संकष्टी चतुर्थी, शनिदेव-श्रीगणेशाचा आशीर्वाद घेण्याचा जुळलाय शुभ योग

आज संकष्टी चतुर्थी, शनिदेव-श्रीगणेशाचा आशीर्वाद घेण्याचा जुळलाय शुभ योग

फाल्गुन संकष्टी चतुर्थी

फाल्गुन संकष्टी चतुर्थी

आज शनिवार, 11 मार्च 2023 रोजी, योगायोगाने आपल्याला शनिदेवासह श्रीगणेशाचा आशीर्वाद देखील मिळू शकतो. आजच्या संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 मार्च : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मानुसार फळ देणारी देवता मानली जाते. ज्या व्यक्तीला शनिदेवाची कृपा प्राप्त होते, त्याला जीवनात शुभफळ प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायांनी गणपतीसोबतच शनिदेवाची कृपाही मिळू शकते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबाबत अधिक माहिती देत आहेत.

आज शनिवार, 11 मार्च 2023 रोजी, योगायोगाने आपल्याला शनिदेवासह श्रीगणेशाचा आशीर्वाद देखील मिळू शकतो. 11 मार्च रोजी हा शुभ योग तयार होत असल्याने आपल्याला श्रीगणेश आणि शनिदेव महाराज या दोघांचाही आशीर्वाद मिळेल. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवशी षोडशोपचार पद्धतीने गणेशाची पूजा करण्याची पद्धत सांगितली गेली आहे. श्रीगणेश हे विघ्न दूर करणारे मानले जातात, त्यामुळे या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व बाधा दूर होतात, असे मानले जाते.

फाल्गुन संकष्टी चतुर्थीचे महत्व -

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी व्रत केले जाते. फाल्गुन महिन्यात आल्यामुळे या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. असे मानले जाते की, संकष्टी चतुर्थीचे व्रत-उपवास केल्यास भाविकांना पुण्य लाभते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी धार्मिक नियमानुसार श्रीगणेशाची आराधना केल्याने व्यक्तीला धन, कीर्ती, वैभव प्राप्त होते, सोबतच व्यक्तीमधील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते, अशी लोकांची श्रद्धा आहे.

भालचंद्र संकष्टी चतुर्थी तिथी आणि चंद्रोदय

फाल्गुन संकष्टी चतुर्थी सुरू होते - 09:42 रात्री (10 मार्च 2023, दिवस शुक्रवार)

चैत्र संकष्टी चतुर्थी संपेल - रात्री १०:०५ (११ मार्च २०२३, शनिवार)

चंद्रोदय वेळ- 10:03

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून लाल वस्त्र परिधान करावे. यानंतर गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ठेवावी. दिवसभर उपवास करावा. रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करावे, गणेशाची पूजा करावी आणि नंतर फलहार करावा. शक्य असल्यास यामध्ये गोड पदार्थ खावेत, खडे मीठ खाऊ नये. या दिवशीच्या पूजेमध्ये गणेश मंत्राचा जप खूप फलदायी असल्याचे सांगितले जाते. गणेश मंत्राचा जप करताना गणपतीला 21 दूर्वा अर्पण करणे देखील खूप शुभ आहे. गणपतीला लाडू खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी बुंदीचे लाडू गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. लाडूंव्यतिरिक्त ऊस, रताळे, गूळ, तिळापासून बनवलेले पदार्थ, गूळ आणि तुपाचे लाडू नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

- संकष्टी चतुर्थीला पूजा करताना गणपतीला तुळशीची मंजुळा किंवा पान अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार, गणपतीने तुळशीचा विवाह प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर तुळशीने गणपतीला दोन लग्नाचा शाप दिला, तर गणरायाने तुळशीला राक्षसाशी लग्न होईल, असा शाप दिला. त्यामुळे गणेशपूजेत तुळशीचा वापर केला जात नाही.

- पाण्यात दूध आणि अक्षदा मिसळून संकष्टी चतुर्थीला चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते. परंतु अर्घ्य अर्पण करताना, ते पाणी पायावर पडणार नाही, याची काळजी घ्या.

- महिलांनी उपवास करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते.

- संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर या दिवशी चुकूनही गणपतीचे वाहन उंदीराला त्रास देऊ नये.

संकष्टीला केलेले पूजन शुभ मानले जाते. व्रत करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

हे वाचा - लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Ganesh chaturthi, Religion