मराठी बातम्या /बातम्या /religion /श्रद्धावानांसाठी खास आहे 11 मार्च, शनिदेव आणि विघ्नहर्त्याच्या कृपेचा शुभ संयोग

श्रद्धावानांसाठी खास आहे 11 मार्च, शनिदेव आणि विघ्नहर्त्याच्या कृपेचा शुभ संयोग

श्रीगणेश

श्रीगणेश

11 मार्च रोजी घडलेल्या या शुभ संयोगाचे फळ मिळून तुम्ही गणपती बाप्पा आणि शनिदेव या दोघांचाही आशीर्वाद घेऊ शकता. भालचंद्र संकष्टी चतुर्थी आज 11 मार्चला शनिवारी आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 मार्च : शनिदेवाची कृपा मिळाल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज शनिवारी, 11 मार्च 2023 रोजी शुभ योगाने तुम्हाला भगवान शनी तसेच श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळू शकतो.

11 मार्च रोजी घडलेल्या या शुभ संयोगाचे फळ मिळून तुम्ही गणपती बाप्पा आणि शनिदेव या दोघांचाही आशीर्वाद घेऊ शकता. भालचंद्र संकष्टी चतुर्थी आज 11 मार्चला शनिवारी आली आहे. या दिवशी तुम्ही गणपतीची पूजा करून गणेशाला प्रसन्न करू शकता.

या दिवशी तुम्ही भगवान गणेशाची तसेच शनिदेवाची पूजा करू शकता, यामुळे तुम्हाला दोन्ही पूजेचे फळ मिळेल. शनिदेव महाराजांना प्रसन्न करण्यासाठी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी, तेलाचा दिवा लावावा आणि शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावेत.

चतुर्थी तिथी भगवान श्रीगणेशाला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळावा म्हणून पूजा-अर्चा केली जाते. दर महिन्याला दोन चतुर्थी येतात. एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षातील चतुर्थीला. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी मानली जाते. प्रत्येक महिन्यात येणार्‍या चतुर्थीचे स्वतःचे महत्त्व आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.

हे वाचा - Sankashti Chaturthi: एका क्लिकवर जाणून घ्या आपल्या शहरानुसार चंद्रोदयाची वेळ

11 मार्चला शनिवारी संकष्टी आल्याने या दिवशी शुभ संयोग तयार होत आहे. या दिवशी शनिदेव सोबतच आपण श्रीगणेशाचा आशीर्वाद देखील घेऊ शकता. या संकष्टीला उत्तर भारतात भालचंद्र संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

भालचंद्र संकष्टी चतुर्थी तिथी आणि चंद्रोदय

चैत्र संकष्टी चतुर्थी प्रारंभ - 09:42 रात्री (10 मार्च 2023, शुक्रवार)

चैत्र संकष्टी चतुर्थी समाप्ती - रात्री 10:05 (11 मार्च 2023, शनिवार)

चंद्रोदयाची वेळ- 10:03

हे वाचा - लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Ganesh chaturthi, Religion