मराठी बातम्या /बातम्या /religion /

आज संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व

आज संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भक्तांची संकटे दूर होतात आणि गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. संकष्टीला चंद्रोदयाची वेळ, शुभ योगांची माहिती पाहून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 09 डिसेंबर : दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केलं जातं. या दिवशी उपवास करून गणेश आणि चंद्राची पूजा केली जाते. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच हे व्रत पूर्ण होते. यावेळची संकष्ट चतुर्थी 11 डिसेंबर, रविवारी आहे. या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भक्तांची संकटे दूर होतात आणि गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. काशीचे ज्योतिषाचार्य चक्रपाणी भट्ट यांनी संकष्टी चतुर्थीचे पूजा मुहूर्त, योग आणि चंद्रोदयाची वेळ याविषयी दिलेली माहिती पाहुया.

संकष्टी चतुर्थी 2022 मुहूर्त

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 11 डिसेंबर रोजी दुपारी 4.14 वाजता सुरू होत असून ही तिथी दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 06.48 वाजता समाप्त होईल. चतुर्थी व्रताच्या पूजेमध्ये चंद्रोदयाला महत्त्व आहे, त्यामुळे 11 डिसेंबर रोजी चतुर्थी तिथीला चंद्रोदय होत आहे, त्यामुळे संकष्टी चतुर्थी व्रत 11 डिसेंबर रोजी पाळण्यात येणार आहे.

तीन शुभ योगांमध्ये संकष्टी चतुर्थी

सकष्टी चतुर्थीला ब्रह्म, रविपुष्य आणि सर्वार्थ सिद्धी हे तीन शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रात्री 08:36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07:04 पर्यंत आहे, तर रविपुष्य योग देखील त्याच वेळी आहे. ब्रह्मयोग सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 05.15 पर्यंत आहे. हे तीनही योग शुभ आणि यश देतात.

संकष्टी चतुर्थी 2022 चंद्रोदयाच्या वेळा

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रोदय होतो, कारण कृष्ण पक्षात चंद्र उशिरा येतो. या दिवशी रात्री 08:40 वाजता चंद्रोदय होईल. जे व्रत ठेवतात ते यावेळी चंद्राला अर्घ्य देतात आणि पूजा करून व्रत पूर्ण करतात.

संकष्टी चतुर्थीवर भद्रची छाया -

भद्रकाळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशीही आहे. 11 डिसेंबरला चतुर्थी तिथी सुरू होईल तेव्हा भद्रकाळ संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भद्राकाळ सकाळी 07:04 ते 04:14 पर्यंत आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात त्यांनी गणेशाची पूजा भद्रकाळाच्या प्रारंभी किंवा संध्याकाळी भद्रकाळाच्या शेवटी करावी.

संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व -

संकष्टी चतुर्थीचा उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढते. संकटे दूर होतात. सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञानातही वाढ होते. गणेशाच्या आशीर्वादाने अशुभ दूर होतात, अडकलेली कामे पूर्ण होतात. यश प्राप्त होते, अशी भाविकांची धारणा आहे.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion