मुंबई, 08 ऑक्टोबर : सामुद्रिक शास्त्रानुसार तळहाताच्या रेषा न बघताही व्यक्तीची देहबोली, वागणूक आणि स्वभाव जाणून घेता येतो. सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीचे शारीरिक स्वरूप, देहबोली, त्याचे गुण यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि नशीब समजू शकते. आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये नाक महत्त्वाचे मानले जाते. नाक व्यक्तीची अनेक वैशिष्ट्ये दर्शवते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया की, नाकावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे ओळखले जाते.
नाकाचा व्यक्तिमत्वाशी संबंध -
सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्याचे नाक सरळ असेल तर तो व्यक्ती साध्या स्वभावाचा असतो. असा माणूस आपलं मत सहजासहजी कोणाला सांगत नाही. हे लोक संयमाने पुढे जातात. या लोकांच्या मनाचा अंदाज घेणे कठीण आहे. या लोकांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत. या लोकांचे जीवनात संबंध लगेच तुटतात.
चपटं नाक असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अस्थिर असते. त्यांचा स्वभाव परिस्थितीवर अवलंबून असतो. असे लोक कोणत्याही निर्णयाची घाई करत नाहीत. असे लोक खूप आकर्षक असतात. त्यांच्यावर लोक प्रभावित होतात.
पोपटासारखे नाक असणारे लोक खूप हुशार असतात. अशा व्यक्तीच्या नाकावर राग राहतो. असे लोक मनाने शुद्ध असले तरी यश मिळविण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.
उठावदार नाक असलेले लोक खूप चपळ असतात. असे लोक प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतात. मात्र, कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी असे लोक नीट विचार करतात.
- लहान नाक असलेले लोक सहसा मजेशीर स्वभावाचे असतात. असे लोक कशाचीही चिंता न करता आयुष्य जगतात. मात्र, असे लोक इतरांच्या डोळ्यात खुपतात. असे लोक विनाकारण दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत.
सामुद्रिक शास्त्रानुसार, लहान आणि जाड नाक असलेल्या व्यक्तीचा मूड रोमँटिक असतो. अशा लोकांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता असते. मात्र, असे लोक गोड बोलण्यात लोकांना अडकवतात. त्यांना समाजात खूप मान असतो.
हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.