मुंबई, 07 डिसेंबर : एखाद्या व्यक्तीचे हावभाव त्याचे वर्तन प्रतिबिंबित करतात. ज्याप्रमाणे हस्तरेषेवरून माणसाचे भविष्य कळू शकते, त्याचप्रमाणे माणसाची मुठ घट्ट पकडण्याची पद्धतही त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगते. मुठ घट्ट पकडण्याच्या पद्धतीवरून व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तीमत्व जाणून घेता येते. या गोष्टीचा सामुद्रिकशास्त्रात उल्लेख आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, एखादी व्यक्ती मुठ घट्ट धरून ज्या पद्धतीने बोटे धरते त्यावरून त्याचे चारित्र्य प्रतिबिंबित होते. जाणून घेऊया माणसाचा स्वभाव मुठीवरून कसा ओळखता येतो.
अंगठ्यावर बोटे ठेवणे -
सामुद्रिकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने मुठ आवळल्यानंतर त्याची सर्व बोटे अंगठ्यावर येत असतील, तर अशी व्यक्ती खूप सर्जनशील आणि बुद्धिमान असते. ती व्यक्ती त्याचे काम चोख आणि पूर्ण करते. अशा व्यक्तीला जास्त बोलायला आवडत नाही, पण सगळ्यांमध्ये पटकन मिसळते. मात्र, असे लोक नातेसंबंधात आनंदी नसतील तर ते नाते लगेच संपुष्टात आणतात.
बोटांवर अंगठा येणं -
त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीने मूठ आवळल्यानंतर सर्व बोटांवर अंगठा ठेवत असेल किंवा पहिल्या तीन तर अशा व्यक्तीचा स्वभाव चांगला असतो. प्रत्येकाला त्याचे व्यक्तिमत्व आवडते. इतरांच्या वागणुकीनुसार ते त्यांचे वर्तन ठेवतात. तथापि, अशा लोकांना थोडी भीती वाटते आणि काहीही करण्यापूर्वी खूप विचार करतात. असे लोक इतरांवर लवकर विश्वास ठेवतात.
एका बोटावर अंगठा
सामुद्रिकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने मूठ आवळल्यानंतर एका बोटावर अंगठा ठेवला तर अशी व्यक्ती खूप जिज्ञासू आणि कुतूहलाने भरलेली असते. अशा व्यक्तीचे समाजात नाव आणि आदर असतो. लोक त्यांच्याशी जोडलेले राहतात. अशा व्यक्तींची बोलण्याची पद्धत लोकांना आवडते. अशा व्यक्तीचे जीवन खूप आनंदी असते, असे मानले जाते.
हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.