मराठी बातम्या /बातम्या /religion /

शरीराचे हे भाग फडफडण्याचा अर्थ काय असतो? शुभ-अशुभ असं ओळखतात

शरीराचे हे भाग फडफडण्याचा अर्थ काय असतो? शुभ-अशुभ असं ओळखतात

शरीराचा कोणताही भाग अचानक फडफडाय लागला तर तो शुभ आणि अशुभ दोन्हींचा संकेत असतो. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया शरीराचे कोणते भाग फडफडणे शुभ-अशुभ मानले जाते.

शरीराचा कोणताही भाग अचानक फडफडाय लागला तर तो शुभ आणि अशुभ दोन्हींचा संकेत असतो. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया शरीराचे कोणते भाग फडफडणे शुभ-अशुभ मानले जाते.

शरीराचा कोणताही भाग अचानक फडफडाय लागला तर तो शुभ आणि अशुभ दोन्हींचा संकेत असतो. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया शरीराचे कोणते भाग फडफडणे शुभ-अशुभ मानले जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 ऑगस्ट : ज्योतिषशास्त्रानुसार शरीराचे अवयव कोणत्याही शुभ-अशुभ घटनेचे संकेत देतात. शरीराचे काही भाग फडफडणे हे शास्त्रात शुभ आणि अशुभाचे लक्षण मानले गेले आहे. डोळे सतत फडफडणे हे अनेकदा अशुभ लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे, शरीराचे वेगवेगळे भाग फडफडणे शुभ-अशुभ संकेत दर्शवतात. शरीराचा कोणताही भाग अचानक फडफडाय लागला तर तो शुभ आणि अशुभ दोन्हींचा संकेत असतो. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया शरीराचे कोणते भाग फडफडणे शुभ-अशुभ मानले जाते.

फडफडण्याचा अर्थ -

ज्योतिषशास्त्रानुसार, सामुद्रिकशास्त्रामध्ये शरीराच्या अवयवांचे फडफडणे आणि त्यापासून मिळणारे शुभ-अशुभ संकेत यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. पुरुषांचे उजवे आणि स्त्रियांचे डावे अंग फडफडणे हे काहीतरी चांगले होणार असल्याचे लक्षण आहे. शरीराचा हा भाग फडफडणे म्हणजे तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते. मात्र हातपाय फडफडणे म्हणजे तुमच्यावर संकटाचे ढग येऊ शकतात.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

अवयवांचे संकेत -

शास्त्रानुसार स्त्रीच्या उजवा कोपरा फडफडणे हे एखाद्याशी भांडण-तंटा होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे असे होत असल्यास आपण सावध राहिले पाहिजे. त्याच वेळी, जर एखाद्या पुरुषाचा तळहात फडफडत असेल तर त्याला भविष्यात काही त्रास सहन करावा लागू शकतो. जर पुरुषांचे दोन्ही खांदे फडफडत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुमचे कोणाशी तरी भांडण किंवा वाद होऊ शकतात. त्याचप्रमाणे माणसाची मान डाव्या बाजूला फडफडत असेल तर ते आर्थिक संकटाचे सूचक असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जमा झालेल्या भांडवलाचा काळजीपूर्वक वापर करावा.

याशिवाय महिलांची नाभी अचानक फडफडू लागली तर ते चोरी, अपघात किंवा घरात मोठे नुकसान होण्याचे लक्षण आहे. जर महिलांच्या उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर तुम्ही दीर्घ आजाराच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता असते.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Religion