मराठी बातम्या /बातम्या /religion /

वास्‍तुदोष घालवण्यासाठी अक्षतांचा करा असा उपाय, कायम राहील घरात सुख-शांती

वास्‍तुदोष घालवण्यासाठी अक्षतांचा करा असा उपाय, कायम राहील घरात सुख-शांती

हिंदू धर्मात अक्षतांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. अक्षतांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही, असे म्हणतात. अक्षताचा उपयोग केवळ पूजेतच नाही तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही केला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 07 ऑक्टोबर : हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये विविध साहित्य वापरले जाते. जसे धूप, अगरबत्ती, कापूर, दिवा, हळद-कुंकू, चंदन, नारळ, अष्टगंध, फुले इ. तसेच अक्षता म्हणजेच तांदूळ देखील प्रत्येक शुभ कार्यात वापरले जातात. हिंदू धर्मात अक्षतांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. अक्षतांशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही, असे म्हणतात. अक्षताचा उपयोग केवळ पूजेतच नाही तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही केला जातो.

अक्षताबाबत शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जीवनात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी अक्षतांचे काही उपाय केले जाऊ शकतात. त्याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी दिलेली माहिती पाहुया.

अक्षतांचे उपाय -

देवांचा आशीर्वाद -

शास्त्रानुसार कोणत्याही पूजेमध्ये अक्षता या महत्त्वाच्या मानल्या जातात. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शिवलिंगावर अक्षता अर्पण करणे शुभ असते. याने भगवान शंकराकडून सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच घरी तांदळाच्या ढिगाऱ्यावर देवी अन्नपूर्णेची स्थापना केल्याने धन आणि वैभव प्राप्त होते. कुंकवामध्ये रंगवून अक्षता देवाला अर्पण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

घरातील वास्तुदोष दूर होतील -

शास्त्रानुसार सूर्यदेवाच्या पूजेमध्ये अक्षताचा समावेश करा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि तेथे अक्षत आणि जल अर्पण करा. दररोज असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो.

तसेच शुक्रवारी घरात लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापित. यानंतर लाल कपड्यात 21 पिवळे तांदूळ बांधून त्याचा बंडल बनवा. देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि मनापासून पूजा करा. यानंतर, बंडल घराच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. या उपायाने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा

परमेश्वराला अक्षता अर्पण करताना कोणताही तांदूळ तुटलेला असू नये याची काळजी घ्यावी. तुटलेला तांदूळ अर्पण केल्यास वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत तांदूळ घेण्यापूर्वी तो अख्खा आहे का ते पहा.

हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion