मुंबई, 3फेब्रुवारी : भारतात ज्योतिष शास्त्राला विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार नावग्रहांचा आपल्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. आठवड्यातील प्रतेक वार विशिष्ट ग्रहाशी निगडीत आहे. जर आपण त्या त्या वारी त्या त्या ग्रहाशी संबंधित कपडे परिधान केले तर आपले नशीब बदलते . आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी कमी होतात. दुखाचे रूपांतर सुखात होते. सोबतच नाशिबाची साथ मिळू लागते.
जाणून घेऊयात सात दिवसांचे सात रंग :
सोमवार : हा दिवस शिव शंकराचा मानला जातो . म्हणून सोमवारी आपण सफेद रंगाचे कपडे धारण करावे.
मंगळवार :मंगळवरचा दिवस हा हनुमानाचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी लाल,केसरी रंगाचे कपडे परिधान करावे .
बुधवार : बुधवार हा गणपती बापांचा चा वार आहे. गणपतीला दूर्वा खूप प्रिय असतात . त्यामुळे त्या दिवशी हिरव्या रंगांचे कपडे परिधान करावेत.
देवाची आरती करताना दिवा तेलाचा लावावा की तूपाचा ?
गुरुवार: गुरुवरचा दिवस हा श्री हरी यांचा दिवस मानला जातो.या देवाला पिवळा रंग खूप प्रिय आहे. म्हणून गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
शुक्रवार : शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा आहे. या दिवशी आपण गुलाबी रंग परिधान करू शकतो. सोबत या दिवशी आपण सफेद रंग ही धारण करू शकतो .
चाणक्य नीतीने करा पैशांचे नियोजन, या 6 सवयींमुळे घरात येते गरिबी
शनिवार : शनिवार हा दिवस शनि देवांचा आहे. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान करा.
रविवार : रविवार हा दिवस सूर्य देवाचा असल्याने या दिवशी आपण सोनेरी रंगाची,केसरी रंगाची कपडे घालावीत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion