मराठी बातम्या /बातम्या /religion /सकाळी आंघोळ केल्यावर जो व्यक्ती गाईला स्पर्श करतो तो पापमुक्त होतो

सकाळी आंघोळ केल्यावर जो व्यक्ती गाईला स्पर्श करतो तो पापमुक्त होतो

पद्म पुराणानुसार गाईच्या मुखात चार वेद वास करतात

पद्म पुराणानुसार गाईच्या मुखात चार वेद वास करतात

पद्म पुराणानुसार गाईच्या मुखात चार वेद वास करतात

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 फेब्रुवारी : हिंदू धर्मात गाईला विशेष महत्व आहे . गाईला देवीचा दर्जा दिला आहे. घरात आई आणि गोठ्यात गाई अशी एक म्हण मराठीत आहे. याचा अर्थ असा की जशी आई घरात हवी तशीच गाई गोठ्यात हवी.

पद्म पुराणानुसार गाईच्या मुखात चार वेद वास करतात. त्याच्या शिंगांमध्ये भगवान शंकर आणि विष्णू नेहमी  वास करतात. गाईच्या पोटात कार्तिकेय, डोक्यात ब्रह्मा, कपाळात रुद्र, शिंगाच्या टोकावर इंद्र, दोन्ही कानात  अश्विनीकुमार, डोळ्यात सूर्य आणि चंद्र, दातांमध्ये गरुड, जिभेत सरस्वती, अपान सर्व तीर्थे, गौमूत्र- ठिकाणी  गंगाजी, छिद्रांमध्ये ऋषीगण, पाठीमागे यमराज, दक्षिण बाजूला वरुण आणि कुबेर, डाव्या बाजूला महाबली  यक्ष, तोंडात गंधर्व, नाकाच्या समोरच्या भागात नाग, खुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा.

शिवलिंगावर अर्पण कराव्यात या 5 गोष्टी, तुमच्या अनंत अडचणी होतील दूर

भविष्य पुराण, स्कंद  पुराण, ब्रह्मांड पुराण, महाभारतातही गाईच्या अवयवांमध्ये देवदेवतांच्या स्थानाचे विस्तृत वर्णन आढळते.  गायींचा समूह जिथे बसून आरामात श्वास घेतो, त्या ठिकाणाचे सौंदर्य तर वाढतेच, पण तिथली सर्व पापे नष्ट  होऊन त्या भागातील ऊर्जा सर्वाधिक होते. जे पुण्य तीर्थक्षेत्रांत स्नान करून, ब्राह्मणभोज करून, उपवास व  नामजप व हवन-यज्ञ करून मिळते, तेच पुण्य गायीला चारा किंवा हिरवे गवत खाऊन मिळते. म्हणूनच त्या  संदर्भात एक उत्तर भारतात लोकांच्यात म्हण अशी ही आहे की  “घंटी माला छोडिये, भले न कीजे जाप, माँ गौ की सेवा कीजिये, हरी आयेंगे आप”  सकाळी आंघोळ केल्यावर जो व्यक्ती गायीला स्पर्श करतो तो पापमुक्त होतो असे म्हणतात. जगातील सर्वात  प्राचीन धर्मग्रंथ म्हणजे वेद आणि वेदांमध्येही गायीचे महत्त्व आणि तिच्या अवयवांमध्ये असलेल्या दैवी शक्तींचे  वर्णन आहे.

काय तो अनोखा गुण? या मुलींकडे असते जणू चुंबकासारखी आकर्षण शक्ती ..

शेणात लक्ष्मी, गोमूत्रात भवानी, पायासमोर आकाशचरी देवता, गडगडाटाच्या आवाजात प्रजापती  आणि कासेत समुद्र. गाईच्या पायाला मातीचा तिलक लावल्याने तीर्थ-स्नानाचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. त्यालाच गोरज  किंवा गोधुली असेही म्हणतात. म्हणजेच सनातन धर्मात गाईला दूध देणारा शुद्ध प्राणी मानण्याऐवजी ती  नेहमीच देवांची प्रतिनिधी मानली गेली आहे.  गाईच्या सेवेने दु:ख आणि संकट दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते. गाईची भक्तिभावाने पूजा आणि सेवा  करणार्‍यावर देव नेहमी प्रसन्न होतात. ज्या घरात जेवण्यापूर्वी गाई-गवत काढले जाते, त्या कुटुंबात अन्न पैशाची कमतरता नसते.

गव्यर्षी डॉ. श्री. नितेश ओझा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion