मुंबई 06 फेब्रुवारी :हिंदू परंपरेत प्रत्येक देवतेच्या विशिष्ठ उपासनेसाठी विशिष्ठ मंत्राची , स्तोत्राची रचना वेदांमध्ये पहावयास मिळते. त्यानुसार वडवानल स्त्रोत्र हे बिभिषण लिखित हनुमानाची स्तुती आहे.
हनुमान हे प्रचंड शक्तिशाली आणि बुद्धीवान, सामर्थ्यवान देवता आहे. कोणत्याही कठिण संकटातून, आव्हानांना पार करुन कठोर परिश्रमातुन आपल्या भक्तांना सहीसलामत बाहेर काढणारे हे दैवत आहे .
वडवानल स्तोत्रात बीज अक्षरांचा वापर केलेला आहे. जेव्हा एखादी समस्या सुटत नसेल, जेव्हा सगळे प्रयत्न संपतात तेव्हा एखाद्या जटिल समस्येवर रामबाण उपाय म्हणून वडवानल स्तोत्रांचे पठन केले जाते. इतर मंत्र्यांच्या अनेक पटीने या मंत्राची शक्ती जास्त आहे. म्हणून या उद्देशाने वडवानल स्तोत्राचे पठण केले जाते. वडवानल स्तोत्रातील बीज अक्षरामुळे चैतन्यात वाढ होते. बीजमंत्र किंवा बीज अक्षरे हे एखाद्या कल्पवृक्षासारखे असतात. कोणत्याही कार्यसिद्धीसाठी त्यांचा सदुपयोग करता येतो. श्री स्वामी समर्थ नित्य उपासनेच्या पुस्तकात सुध्दा या स्त्तोत्राचा उल्लेख आहे.
वडवानल स्तोत्राच्या उच्चाराने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फलप्राप्ती करून घेण्याची ताकद असते. परंतु चुकीचा मंत्र उच्चारल्याने साधकाला त्याची अनिष्ठ फळे मिळतात. त्यामुळे कोणतेही स्तोत्र व मंत्र स्वतःच्या मनाने कधीच म्हणू नये. ते जाणकार व्यक्तींकडून शिकून घ्यावे आणि आपण ते कोणत्या कारणासाठी करीत आहोत व ती समस्या सुटणे किती महत्त्वाचे आहे हे पाहून त्यानुसार त्याचा संकल्प सोडावा. मग यथायोग्य स्तोत्राचे पठण करावे.
काही वेळा खूप लोक सांगतात आमच्या वर कोणीतरी तंत्र-मंत्र (काळी जादू) अनिष्ट शक्तीचा वापर केला आहे. अशावेळी या त्रासांच्या निवारणार्थ अनेक लोक बुवा बाबांकडे जातात. पण कृपया त्या मार्गाने जाऊ नका आपली समस्या सोडविण्यासाठी तंत्र -मंत्र करणाऱ्या बुवा-बाबांचा आधार घेऊ नका. आपल्या समस्या सोडवण्यासाठी वडवानल स्तोत्रासारखे अनेक पवित्र साधना, उपाय, उपासना वेदादी ग्रंथांत सांगितले आहेत.
बलाढ्य व आसुरी शक्तींना परतवून लावण्याची ताकद या वडवानल स्तोत्रात आहे. अशा प्रकारच्या पवित्र आणि शक्तीशाली स्तोत्राचे उपयोग करा आणि आपली सुटका करून घ्या. वडवानल स्तोत्राची सुरूवात मंगळवारी किंवा शनिवारी करावी आणि ते स्त्रियांनी वाचले तरी चालते.
योगिनी डॉ. स्मिता राऊत
ज्योतिषी
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.