मराठी बातम्या /बातम्या /religion /तृतीयपंथीयांच्या लग्नाची परंपरा, एका रात्रीची वधू बनण्यासाठी 18 दिवस विवाह

तृतीयपंथीयांच्या लग्नाची परंपरा, एका रात्रीची वधू बनण्यासाठी 18 दिवस विवाह

तृतीयपंथीयांची अरावण देवतेशी लग्न करण्याची परंपरा आहे. हा विवाह सोहळा अतिशय भव्य 18 दिवस चालवतात.

तृतीयपंथीयांची अरावण देवतेशी लग्न करण्याची परंपरा आहे. हा विवाह सोहळा अतिशय भव्य 18 दिवस चालवतात.

तृतीयपंथीयांची अरावण देवतेशी लग्न करण्याची परंपरा आहे. हा विवाह सोहळा अतिशय भव्य 18 दिवस चालवतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 जानेवारी: समाजात स्त्री-पुरुषांव्यतिरिक्त एक तिसरा समाजही आहे ज्याला किन्नर किंवा तृतीयपंथी म्हणतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्री-पुरुषांव्यतिरिक्त अनेक ठिकाणी यक्ष, गंधर्व आणि किन्नरांचा उल्लेख आढळतो. त्यांचे स्वतःचे एक वेगळे विश्व आहे. किन्नरांशी संबंधित अशा अनेक रहस्यमय आणि मनोरंजक समजुती आणि परंपरा आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला तृतीयपंथीयांच्या अशाच एका परंपरेबद्दल सांगणार आहोत, ज्याला जाणून तुम्हीही थक्क व्हाल. तृतीयपंथीयांची अरावण देवतेशी लग्न करण्याची परंपरा आहे. हा विवाह सोहळा अतिशय भव्य 18 दिवस चालवतात. चला तर मग जाणून घेऊया या परंपरेबद्दल.

तृतीयपंथीयांचे होते अरावणाशी लग्न

तामिळ कॅलेंडरनुसार दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी, किन्नर तामिळनाडूमधील विल्लुपुरम जिल्ह्यातील कुनगाम गावात विवाह समारंभ आयोजित करतात. जो 18 दिवस चालतो. यादरम्यान नृत्य-गाणी इत्यादींचे अनेक कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो तृतीयपंथीय जमतात. विवाह सोहळ्याच्या 17व्या दिवशी, तृतीयपंथीय वधूच्या रूपात तयार होतात आणि नंतर भगवान अरावणाच्या मंदिरात जातात आणि त्याच्याशी लग्न करतात. यासाठी मंदिराचे पुजारी तृतीयपंथीयाच्या गळ्यात अरावण देवाच्या नावाने मंगळसूत्र घालतात. त्यामुळे तृतीयपंथीयाचे लग्न अरावण देवाशी होते.

फक्त एका रात्रीसाठी असते लग्न

भगवान अरावणाशी विवाह झाल्यानंतर नपुंसक नृत्य करून आणि गाऊन आपला आनंद व्यक्त करतात. तृतीयपंथीयांचा हा आनंद केवळ एका दिवसासाठी असतो, कारण त्यांचे लग्न केवळ एका रात्रीसाठी असते. अशा परंपरेनुसार 18 तारखेला अरावण देवाची मूर्ती सिंहासनावर ठेवून संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पूजारी भगवान अरावण देवतेचे शिर प्रतिकात्मकरीत्या कापतात, त्यामुळे सर्व तृतीयपंथीय विधवा होतात. अशा परिस्थितीत किन्नर आपल्या बांगड्या फोडतात आणि विधवेचा पोशाख म्हणजे पांढरी साडी नेसून शोक करतात. यानंतर, 19 व्या दिवशी सर्व नपुंसक आपले मंगळसूत्र अरावण देवाला अर्पण करतात आणि नवीन मंगळसूत्र घालतात.

कोण आहे अरावण देव आणि काय आहे या परंपरेचे महत्त्व

तृतीयपंथीय दैवत भगवान अरावण याचा इतिहास महाभारताशी संबंधित आहे. अरावण हा देव अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांचा मुलगा होता. धार्मिक मान्यतांनुसार, महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडव मां कालीची पूजा करण्यासाठी गेले होते, जिथे त्यांना एका राजकुमाराचा बळी देण्यास सांगण्यात आले होते. अशा स्थितीत अरावण बळी देण्यास तयार झाला. पण त्यागासाठी तयार असलेल्या राजपुत्राने लग्न करणेदेखील आवश्यक होते. अशा स्थितीत भगवान श्रीकृष्ण स्वतः मोहिनीचे रूप धारण करून अरावनशी विवाह केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अरावण देव स्वत: त्याचे मस्तक कापून देवीला अर्पण करतो.

अशा स्थितीत मोहिनीचे रूप धारण केलेले श्रीकृष्ण विधवेप्रमाणे रडू लागतात. श्रीकृष्णाने पुरुष असूनही स्त्री बनून अरावणाशी लग्न केले होते. अशा स्थितीत श्रीकृष्णाचे हे रूप तृतीयपंथीयासारखेच होते असे मानतात, त्यामुळे श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे अरावणशी विवाह केला त्याचप्रमाणे किन्नरही अरावण देवाला आपला पती मानून त्याच्याशी लग्न करतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion