मराठी बातम्या /बातम्या /religion /अचानक अंत्ययात्रा दिसली तर घाबरू नका, अशुभ नव्हे शुभ ठरू शकतं !

अचानक अंत्ययात्रा दिसली तर घाबरू नका, अशुभ नव्हे शुभ ठरू शकतं !

 मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यात विलीन होतो. म्हणूनच अंत्ययात्रा पाहताच त्यावर फुलांचा वर्षाव करा. याद्वारे तुम्ही देवाचा आदर कराल.

मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यात विलीन होतो. म्हणूनच अंत्ययात्रा पाहताच त्यावर फुलांचा वर्षाव करा. याद्वारे तुम्ही देवाचा आदर कराल.

मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यात विलीन होतो. म्हणूनच अंत्ययात्रा पाहताच त्यावर फुलांचा वर्षाव करा. याद्वारे तुम्ही देवाचा आदर कराल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 जानेवारी: जो जन्माला येतो एक ना एक दिवस त्याचा अंतही होतो. पण माणसाचा मृत्यू होताच लोक त्याला घाबरू लागतात. घरातून बाहेर पडताना अंत्ययात्रा दिसणे हे अशुभ मानला जातो. परंतु, हिंदू मान्यतेनुसार, हे एक अतिशय शुभ चिन्ह आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे वाटेत मृतदेह पाहून काही विशेष काम केले पाहिजे.

1. वाटेत अंत्ययात्रा दिसली की लगेच प्रभू श्रीरामाचे नाव घ्यावे. यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुम्हाला पुण्य मिळेल.

2. अंत्ययात्रा पाहून तेथे उभे राहून दोन मिनिटे मौन पाळा. यासोबतच मृत व्यक्तीच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना करा. असे केल्याने देव तुम्हाला आशीर्वाद देईल.

3. मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यात विलीन होतो. म्हणूनच अंत्ययात्रा पाहताच त्यावर फुलांचा वर्षाव करा. याद्वारे तुम्ही देवाचा आदर कराल.

4. जर तुमच्या जवळून अंत्ययात्रा जात असेल तर प्रथम त्यांना जाण्यासाठी जागा द्या. असे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील.

5. वाटेत अनोळखी व्यक्तीची अंत्ययात्रा पाहिल्यावर आपल्या क्षमतेनुसार एक रुपया किंवा नाणी अर्पण करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

6. प्रभू हरीला मखाने आवडतात, म्हणून अंत्ययात्रा पाहून मखाने टाकले पाहिजे. यामुळे आत्म्याला समाधान मिळते.

7. जर तुमच्या ओळखीच्या कोणाची अंत्ययात्रा निघत असेल तर अंत्यविधीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे समस्यांपासून सुटका मिळेल.

8. अंत्ययात्रा पाहून भगवान शंकराचे ध्यान करावे. कारण भोलेनाथ हे परब्रह्म मानले जातात. तुमचे नशीब याने चमकू शकते.

9. अंत्यसंस्कार पाहून तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. यामुळे तुमची प्रगती होईल.

10. विवाहित महिलेची अंत्ययात्रा पाहिल्यास सिंदूर दान करा. यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी होईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion