मराठी बातम्या /बातम्या /religion /जीवनातील प्रत्येक ध्येय गाठणे होईल सोपे फक्त हे एकदा वाचा

जीवनातील प्रत्येक ध्येय गाठणे होईल सोपे फक्त हे एकदा वाचा

समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे

समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे

समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 9 फेब्रुवारी :  गौतम  बुद्धांचा जन्म राजघराण्यात इ.स.पूर्व 563 मध्ये नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांनी रोग, म्हातारपण आणि मृत्यू यांसारखी मानवी जीवनातील दु:खे पाहिली. यानंतर वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी संसार सोडून सत्याचा शोध सुरू केला. बोधगयेतील पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. तेव्हापासून ते वयाच्या 80 व्या वर्षी महापरिनिर्वाणापर्यंत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रवासात आणि लोकांना जीवनाच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवण्यात घालवले.  भगवान बुद्धांचे असेच अनमोल विचार आपण येथे पाहणार आहोत, जे माणसाला आयुष्यातील कोणतेही ध्येय गाठण्याचा खरा मार्ग दाखवतात.

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शिष्यांनी राजगृह येथे एक परिषद बोलावली, जिथे बौद्ध धर्माच्या मुख्य शिकवणी संहिताबद्ध केल्या गेल्या. महात्मा बुद्धांच्या तत्त्वांवर आधारित बौद्ध धर्म हीनयान आणि महायान या दोन पंथांमध्ये विभागला गेला.

बुद्धांच्या तत्त्वांवर आधारित बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे काम बौद्ध धर्माच्या अनुयायांनी केले, महात्मा बुद्धांचे संदेश आणि विचार जगभरात अवलंबिले जातात आणि सध्याच्या काळातही प्रासंगिक मानले जातात.

भगवान बुद्धांच्या मते, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे तर आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. तथागत सांगतात की, जीवनातील कोणतेही उद्दिष्ट किंवा ध्येय गाठण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या प्रकारे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.  बुद्धांच्या मते, नेहमी रागावणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने जळते लाकूड स्वतःकडे धरून ठेवण्यासारखे आहे.  भगवान बुद्धांच्या मते, राग आधी स्वत: तुम्हाला जाळत असतो. म्हणूनच रागाच्या भरात एक हजार चुकीचे शब्द बोलण्यापेक्षा, मौनाचा तो एक शब्द जीवनात शांतता आणतो.

महात्मा बुद्धांच्या मते, एखाद्याने जंगली प्राण्यापेक्षा कपटी आणि दुष्ट मित्राला घाबरले पाहिजे. एखादा जंगली प्राणी तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतो, तर वाईट मित्र तुमच्या बुद्धीला हानी पोहोचवू शकतो.

महात्मा बुद्धांच्या मते, मनुष्याने आपल्या भूतकाळावर लक्ष केंद्रित करू नये किंवा भविष्याचा विचार करू नये. वर्तमानात जगण्याची सवय लावली पाहिजे, तरच आयुष्यात शांतता नांदेल.

आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. जर तुम्ही असे केले तर विजय नेहमीच तुमचाच असेल, तो तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

महात्मा बुद्धांच्या मते, वाईटाने वाईटाचा नायनाट करता येत नाही. द्वेषाचा अंत फक्त प्रेमानेच होऊ शकतो, हेच अटळ सत्य आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion