मराठी बातम्या /बातम्या /religion /

Dussehra 2022 Special: श्री रामाशिवाय या युद्धांमध्ये लंकापती रावणाचा झाला होता पराभव

Dussehra 2022 Special: श्री रामाशिवाय या युद्धांमध्ये लंकापती रावणाचा झाला होता पराभव

श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाची माहिती अबाल-वृद्ध सर्वांनाच आहे. पण रावणाचा पराभव फक्त श्रीरामांनीच केला असे नाही. इतर चार योद्ध्यांनीही लंकापती रावणाला पळवून लावलं होतं.

श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाची माहिती अबाल-वृद्ध सर्वांनाच आहे. पण रावणाचा पराभव फक्त श्रीरामांनीच केला असे नाही. इतर चार योद्ध्यांनीही लंकापती रावणाला पळवून लावलं होतं.

श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाची माहिती अबाल-वृद्ध सर्वांनाच आहे. पण रावणाचा पराभव फक्त श्रीरामांनीच केला असे नाही. इतर चार योद्ध्यांनीही लंकापती रावणाला पळवून लावलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 04 ऑक्टोबर : रामायणानुसार लंकापती रावण इतका शक्तिशाली होता की, त्याला हरवणे कोणालाही शक्य नव्हते. रावणाला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. त्याने सीता मातेचे अपहरण केले आणि भगवान श्री रामाला युद्धासाठी आव्हान दिले. महाविष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामासमोर रावणाचे गर्वहरण झाले. श्रीरामाने रावणाचा वध करून लंका जिंकली. श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाची माहिती अबाल-वृद्ध सर्वांनाच आहे. पण रावणाचा पराभव फक्त श्रीरामांनीच केला असे नाही. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, श्रीरामाव्यतिरिक्त रावणाचा चार योद्ध्यांनी पराभव केला होता, याचा उल्लेख पुराणात आहे. दसरा स्पेशलमध्ये याशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घ्या.

रावण शिवाशी लढायला गेला -

पौराणिक कथेनुसार, आपल्या शक्तीच्या अभिमानाने, रावण एकदा कैलास पर्वतावर पोहोचला आणि भगवान शिवाला युद्धासाठी आव्हान दिले. त्यावेळी भगवान शिव गहन तपश्चर्येत लीन झाले होते. रावणाने आपल्या सामर्थ्याने कैलास पर्वत उचलण्यास सुरुवात केली. तेव्हा शिवाने आपल्या पायाच्या बोटाने कैलासाचे वजन इतके वाढवले​की, रावणाचा हात त्याच्याखाली गाडला गेला. आपल्या सर्व शक्तींच्या जोरावरही रावण कैलास पर्वत हलवू शकला नाही, त्यानंतर रावणाने शिव-महादेवाची माफी मागितली आणि त्यांना आपला गुरु मानलं.

वानर बालीशी लढला आणि -

रावणाला कळले होते की, वानरराजा बाली खूप शक्तिशाली आहे, म्हणून तो त्याच्याशी लढायला पोहोचला. त्यावेळी बाली पूजा करत होता. त्यानंतर रावणाने बळीला युद्धासाठी आव्हान दिले, मात्र बालीने रावणाला आपल्या बाहूत दाबून चार समुद्रांची परिक्रमा सुरू केली. रावणाने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. यानंतर बालीने रावणाला मुक्त केले. मग रावणाने बालीशी मैत्री केली.

हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण

राजा बालीच्या महालात फजिती -

एका पौराणिक कथेनुसार, रावण तिन्ही लोकांचा स्वामी होण्याच्या इच्छेने राक्षस राजा बालीच्या जवळ अधोलोकात पोहोचला. रावणाने बळी राजाला युद्धाचे आव्हान दिले. त्यावेळी बालीच्या राजवाड्यात काही मुले खेळत होती. त्या मुलांनी रावणाला पकडून बांधले.

रावण सहस्त्रबाहू अर्जुनाशी लढला -

सहस्त्रबाहू अर्जुन खूप शक्तिशाली होता. एकदा रावण सहस्त्रबाहू अर्जुनाशी लढायला गेला होता. तेव्हा सहस्त्रबाहू अर्जुनाने नर्मदा नदीला आपल्या एक हजार हातांनी रोखून धरलं आणि अचानक सोडून दिलं. त्यामुळे रावण जोरदार प्रवाहात नदीत वाहून गेला. अशा प्रकारे रावणाचा येथेही पराभव झाला.

First published:

Tags: Navratri, Religion