मराठी बातम्या /बातम्या /religion /

Rakshabandhan 2022 : या शुभ मुहूर्तावर लाडक्या भावाला बांधा राखी, जाणून घ्या शुभ दिशा आणि विधी

Rakshabandhan 2022 : या शुभ मुहूर्तावर लाडक्या भावाला बांधा राखी, जाणून घ्या शुभ दिशा आणि विधी

यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याच्या वेळेबाबत पेच निर्माण झाला आहे. याचे कारण भद्रा आहे. भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 7 ऑगस्ट : यंदा रक्षाबंधनाचा सण गुरुवार ११ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते म्हणून याला रक्षाबंधनाला म्हणतात. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याच्या वेळेबाबत पेच निर्माण झाला आहे. याचे कारण भद्रा आहे. भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यावर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे. हे सांगणार आहोत. रक्षाबंधन तिथी काशी पंचांग नुसार, श्रावण महिन्याची पौर्णिमा गुरुवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 09:34 पासून सुरू होते आणि दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 05:58 पर्यंत असते. 12 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सूर्योदयाच्या आधी संपत आहे. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत 11 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस श्रावण पौर्णिमा असल्याने या दिवशी रक्षाबंधन साजरे करणे योग्य आहे.

Rakshabandhan 2022 : भावाला राखी बांधताना किती गाठी मारणे असते शुभ? या मुहूर्तावर बांधा राखी

राखी बांधण्याची वेळ 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वात मोठी समस्या भाद्रच्या मुहूर्ताची आहे. 11 ऑगस्ट रोजी भद्रा सकाळी 09:34 ते संध्याकाळी 04:26 पर्यंत आहे. त्यामुळे संपूर्ण भाद्र काळात राखी बांधता येणार नाही. अशा स्थितीत 11 ऑगस्टला 04:26 मिनिटांपासून पुढे तुम्ही राखी बंधू शकता.

Surya Grahan 2022 : यंदा दिवाळीवर सूर्यग्रहणाचं सावट! तुम्हाला माहिती असाव्यात या गोष्टी

राखी बांधताना ही असावी दिशा राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे असे ज्योतिषी सांगतात. त्याचबरोबर भावाची पाठ पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावी. त्याचबरोबर भावाने राखी बांधताना डोक्यावर रुमाल किंवा छोटे कापड नक्की ठेवावे. डोक्यावर रुमाल ठेवल्यानंतर बहिणीकडून टिळा लावून घ्यावा आणि राखी बांधून घ्यावी. हेच शुभ असते.
First published:

Tags: Lifestyle, Raksha bandhan, Religion

पुढील बातम्या