मराठी बातम्या /बातम्या /religion /

Rakshabandhan 2022: भावाला राशीनुसार अशा रंगाची बांधा राखी; त्याच्यावरची टळतील संकटे

Rakshabandhan 2022: भावाला राशीनुसार अशा रंगाची बांधा राखी; त्याच्यावरची टळतील संकटे

ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी भावांना राशीनुसार योग्य रंगांच्या राखी बांधाव्या. यामुळे नाते मजबूत होते आणि भावाचे सर्व संकटांपासून रक्षण होते. त्याविषयी जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी भावांना राशीनुसार योग्य रंगांच्या राखी बांधाव्या. यामुळे नाते मजबूत होते आणि भावाचे सर्व संकटांपासून रक्षण होते. त्याविषयी जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी भावांना राशीनुसार योग्य रंगांच्या राखी बांधाव्या. यामुळे नाते मजबूत होते आणि भावाचे सर्व संकटांपासून रक्षण होते. त्याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 09 ऑगस्ट : हिंदू कॅलेंडरनुसार रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन 11 ऑगस्ट 2022 रोजी आहे. रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम आणि दृढ नात्याचे प्रतिक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधतात आणि त्याला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात, त्यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्याशी संबंधित हे रक्षासूत्र बांधताना मंत्र, नियम आणि मुहूर्ताची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी भावांना राशीनुसार रंगांच्या राखी बांधाव्या. यामुळे नाते मजबूत होते आणि भावाचे सर्व संकटांपासून रक्षण होते. दिल्लीचे ज्योतिषी आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया, रक्षाबंधनाच्या दिवशी राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी  (Rakshabandhan) बांधावी. राशीनुसार कोणत्या रंगाची राखी बांधावी - मेष- आपल्या भावाची राशी मेष असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी त्याला लाल रंगाची राखी बांधणे शुभ राहील. त्यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम वाढते. याशिवाय गुलाबी आणि पिवळ्या रंगाची राखीही बांधू शकता. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या किंवा आकाशी रंगाची राखी बांधणे शुभ असते. जर तुमच्या भावाची राशी देखील वृषभ असेल तर रक्षाबंधनाला बहिणी त्याला पांढऱ्या आणि आकाशी रंगाची राखी बांधू शकतात. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग खूप शुभ मानला जातो, म्हणून रक्षाबंधनाला बहिणी हिरव्या रंगाची राखी बांधावी. याशिवाय आपण निळ्या आणि गुलाबी रंगाची राखीही बांधू शकता. कर्क - ज्योतिषशास्त्रानुसार जर आपल्या भावाची राशी कर्क असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी आपण त्याला पांढरी किंवा फिकट पिवळी राखी बांधू शकता. यामुळे भावाच्या जीवनात सुख-समृद्धी येते. सिंह - ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी केशरी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते. यामुळे भाऊ-बहिणीचे नाते घट्ट होते. कन्या- जर आपल्या भावाची राशी कन्या असेल तर तुम्ही त्याला फिकट हिरवी किंवा गुलाबी रंगाची राखी बांधू शकता. तूळ- तूळ राशीच्या भावांना तुम्ही चमकदार पिवळ्या, पांढर्‍या आणि निळ्या रंगाची राखी बांधू शकता. वृश्चिक- या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ लाल रंगाशी संबंधित आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावांना लाल रंगाची राखी बांधली तर ती खूप शुभ मानली जाते. धनु- ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु हा धनु राशीचा स्वामी मानला जातो, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी या राशीच्या भावांना पिवळ्या रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. मकर - मकर राशीच्या भावांना रक्षाबंधनाला निळी किंवा बहुरंगी राखी बांधणे शुभ आहे. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत कुंभ- कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा, काळा गडद रंग शुभ असतो, त्यामुळे रक्षाबंधनाला या रंगांची राखी बांधा. याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि कार्यक्षेत्रात प्रगती होते. मीन- जर तुमच्या भावाची राशी मीन असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी त्याला पिवळी राखी बांधा. त्यामुळे सर्व प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी असतो, ज्याला त्या राशीचा शासक ग्रह म्हणतात. त्यामुळे राशीनुसार रंगांनी राखी बांधल्याने राशीतील ग्रह बलवान होतात.
First published:

Tags: Raksha bandhan, Rashibhavishya

पुढील बातम्या